By-Election Results 2025: पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला धुळ चारणारे गोपाल इटालिया कोण?
By-Election Results 2025 Who is your Gopal Italy : देशात चार राज्यातील पाच विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले आहेत. काँग्रेसला केरळमध्ये तर भाजपला गुजरातमध्ये एका जागेवर विजय मिळाला तर आम आदमी पक्षाला गुजरात आणि पंजाबमध्ये तर टीएमसीला पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीच्या जागेवर विजय मिळाला आहे. आप या निवडणुकीत पाचपैकी दोन जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
गुजरातेत दोन जागांपैकी एक जागा आपला मिळाली हा मोठा आणि अभुतपूर्व विजय मानला जात आहे. गुजरातच्या विसावदर विधानसभा जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) मोठी धमाका केला आहे. पक्षाचे उमेदवार गोपाल इटालिया यांनी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार किरीट पटेल यांचा पराभव केला आहे.

किती पडली गोपाल इटालिया यांना मतं?
गोपाल इटालिया यांना एकूण ७५, ९४२ मते मिळाली असून ते त्यांचे प्रतिस्पर्धी किरीट पटेल यांच्यापेक्षा १७, ५५४ मतांनी पुढे होते. हा विजय केवळ एका जागेचा नाही तर गुजरातमध्ये आम आदमी पक्षाची मुळे मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जाते. चला जाणून घेऊया कोण आहेत गोपाल इटालिया.
गोपाल इटालिया कोण आहेत?
- गोपाल इटालिया हे आम आदमी पक्षाचे नेते आणि पाटीदार समाजाचा एक मजबूत चेहरा आहेत.
- गुजरातमध्ये पक्षाच्या सुरुवातीच्या विस्तारात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
- पाटीदार आरक्षण चळवळीत सक्रिय भूमिका बजावताना आणि हार्दिक पटेलसह तरुणांचा एक नवीन आवाज म्हणून उदयास आल्याने इटालियाचे नाव प्रसिद्धीच्या झोतात आले.
- गोपाल इटालिया हे पूर्वी सरकारी लिपिक होते, परंतु व्यवस्थेबद्दल असंतोष आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांनी नोकरी सोडली.
- गोपाल इटालीया हे नोकरी सोडल्यानंर सामाजिक आणि राजकीय कार्यात पूर्णपणे सहभागी झाले.
गोपाल इटालीयांचे शिक्षण किती?
- गोपाल इटालिया यांनी २०१६ मध्ये गुजरात विद्यापीठातून बीए आणि २०२० मध्ये सौराष्ट्र विद्यापीठातून एसवाय पदवी घेतली आहे.
- मीडिया रिपोर्टनुसार, गोपाल पूर्वी गुजरात पोलिसात कॉन्स्टेबल होते, नंतर ते महसूल लिपिक झाले.
- इटालीा यांचा सध्या त्यांचा व्यवसाय सल्लागार असल्याचे सांगितले जाते.
गोपाल इटालियाची संपत्ती किती?
गोपाल इटालिया यांच्याकडे १० लाख रुपये आहेत. यामध्ये १. १३ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. गोपाल आणि त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात सुमारे ६ लाख रुपये आहेत. त्यांच्याकडे १.१० लाख रुपयांचे सोने आहे. गोपाल इटालियावर कोणतेही कर्ज नाही.
आपच्या या नेत्याचा राजकीय प्रवास
गोपाल इटालिया हे आपचे प्रमुख नेते आहेत. त्यांनी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत कटारगाम मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांचा पराभव झाला असला तरी, त्यांनी गुजरातमध्ये आम आदमी पक्षाची एक नवीन ओळख निर्माण करण्याचे काम केले. २०२० ते २०२२ पर्यंत गुजरातमध्ये गोपाल इटालियावर १७ गुन्हे दाखल झाले. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्याच्या कर्तव्यात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाऱ्याने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करणे आणि अपशब्द वापरणे यांचा समावेश आहे.












Click it and Unblock the Notifications