By election Result 2025 today : 4 राज्यातील पोट निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार, मतमोजणीला सुरुवात
By election Result 2025 today : गुजरातसह चार राज्यात झालेल्या पाच विधानसभा जागांसाठी आज निकाल जाहीर होणार आहेत. आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. चार राज्यात भाजप की काँग्रेस अथवा इतर कोणता पक्ष बाजी मारतो हे काही तासात कळणार आहे.

या राज्यातील निकालावर लक्ष
चार राज्यांमध्ये गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश असून या ठिकाणी १९ जून रोजी ५ विधानसभा जागांसाठी मतदान झाले. आता या राज्यातील विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीचे आज काही वेळात निकाल हाती येणार आहेत.
कुठे पार पडली मतदानप्रक्रीया
केरळच्या निलांबूर मतदारसंघात, पंजाबच्या लुधियाना पश्चिम मतदारसंघात, पश्चिम बंगालच्या कालीगंज मतदारसंघात आणि गुजरातच्या विसावदर आणि काडी मतदारसंघात मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आता यात गुजरात वगळता भाजप शासित एकही हे राज्य नाही त्यामुळे भाजपची कामगिरी येथे खूपच चांगली होईल ही अपेक्षा नाही असे तज्ज्ञ म्हणतात.
पोटनिवडणुकांचे निकाल लवकरच कळणार, कोण जिंकणार?
पोटनिवडणुकांचे निकालाची मतमोजणी सुरु होताच कल यायला सुरुवात होईल.. कडक सुरक्षेत सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली.
अरविंद केजरीवाल यांची खेळी
आपने लुधियाना पश्चिम येथून राज्यसभेचे खासदार संजीव अरोरा यांना विधानसभेची उमेदवारी दिली आहे, जर त्यांनी ही जागा जिंकली तर त्यांना राज्यसभेची जागा सोडावी लागेल, ज्यामुळे राज्यसभेची जागा रिक्त होईल आणि अरविंद केजरीवाल यांचा रस्ता साफ करण्यासाठी ही खेळी आहे. जर जागा जिंकलीच तर अरोरा राज्यसभेचा राजीनामा देतील आणि आप या जागेवरून अरविंद केजरीवाल यांना राज्यसभेवर पाठवू शकते.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications