संसदेत काँग्रेस खासदाराच्या आसनाखाली नोटांचे बंडल, उडाली एकच खळबळ
संसदेत आज अभूतपुर्व घटना घडली. काँग्रेस खासदाराच्या खुर्चीखाली नोटांचे बंडल सापडल्याचा खळबळजनक दावा राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी केला. सफाई कर्मचाऱ्याला आसन क्रमांक 222 खाली ही रोख रक्कम मिळाल्याचे सांगण्यात येत असून, हे आसन काँग्रेसचे खासदार अभिषेक मनु सिंघवी यांचे आहे. सभापतींच्या या दाव्यानंतर राज्यसभेत काँग्रेस- भाजप समोरासमोर आले. याप्रकरणी चौकशी करणार असल्याचेही सभापतींनी सांगितले.

राज्यसभेत काय घडले
राज्यसभेमध्ये काँग्रेस खासदाराच्या खुर्चीखाली नोटांचा बंडल सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ सुरू आहे. राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी काँग्रेस खासदार अभिषेक मनू सिंघवी यांच्या आसनाखाली नोटांचे बंडल सापडल्याचा दावा केला. ५ डिसेंबर रोजी कामकाज तहकूब केल्यानंतर एका जागेतून ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल सापडले असल्याची माहिती धनखर यांनी सभागृहाला दिली.
#WATCH | Rajya Sabha Chairman Jagdeep Dhankhar says, "I here by inform the members that during the routine anti-sabotage check of the chamber after the adjournment of the House yesterday. Apparently, a wad of currency notes was recovered by the security officials from seat number… pic.twitter.com/42GMz5CbL7
— ANI (@ANI) December 6, 2024
काँग्रेस खासदाराचे होते आसन
हे आसन तेलंगणातील राज्यसभा सदस्य अभिषेक मनू सिंघवी यांचे आहे. याची चौकशी झाली पाहिजे, असं त्यांनी म्हटले. यावरुनच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. तुम्हीही या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगत आहात, त्यामुळे जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही आणि त्याची सत्यता सिद्ध होत नाही, तोपर्यंत कोणाचेही नाव घेऊ नका, असे म्हणत त्यांनी धनखड यांना खडेबोल सुनावले.
#WATCH | Delhi: Congress MP and advocate Abhishek Manu Singhvi says "I am quite astonished to even hear about it. I never heard of it. I reached the inside of the House yesterday at 12.57 pm. The House rose at 1 pm. From 1 to 1:30 pm, I sat with Ayodhya Prasad in the canteen and… https://t.co/XISu0YQm0Z pic.twitter.com/e2k9iBE43P
— ANI (@ANI) December 6, 2024
सिंघवी यांनी केला खुलासा
याप्रकरणी अभिषेक मनु सिंघवी यांनी याप्रकरणाचा खुलासा करताना ही रोख रक्कम आपली नसल्याचे स्पष्ट केले. माझ्याकडे फक्त 500 रुपयांची नोट होती. मी 12.57 वाजता सभागृहात पोहोचलो आणि तेथून 1 वाजता निघालो, त्यानंतर मी 1.30 वाजता कॅन्टीनमध्ये बसलो. त्यानंतर आपण संसदेतून बाहेर पडलो असे सिंघवी यांनी स्पष्ट केले.












Click it and Unblock the Notifications