क्षणात धाड्धाड् कोळली इमारत! सुरत दुर्घटनेत 7 ठार, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले

Surat Building Collapse : शनिवारी मुसळधार पावसामुळे सुरतमधील बहुमजली इमारत एका क्षणात धाड्धाड् कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला. गंभीर बाब म्हणजे अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Surat Building Collapse

गेल्या 12 तासांपासून येथे बचावकार्य सुरू आहे. विशेष म्हणजे ही इमारत 2016 -17 या काळात बांधण्यात आली होती. इमारत कोसळल्यानंतर झालेल्या दुर्घटनेत एका महिलेला तातडीने बाहेर काढण्यात आले, तर रात्री उशिरा अन्य तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर पोलिस आयुक्त अनुपम सिंह गेहलोत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, बचावकार्य सुरू आहे, लोकांना सर्वतोपरी मदत केली जात आहे.

अनेक लोक दबले, बचावकार्य सुरू

सुरतच्या सचिन भागात एक बहुमजली इमारत कोसळल्याने अनेक लोक मलब्यात अडकले आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. एसडीआरएफ, एनडीआरएफ, अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. आज सकाळी पोलिसांनी सांगितले की, ढिगाऱ्याखालून तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर सहा जण अजूनही आत अडकले आहेत. बचाव कार्याच्या सुरुवातीला आत अडकेलेल्या लोकांकडून मदतीसाठी आवाज येत होता.

या घटनेत ढिगाऱ्याखाली दबलेल्या महिलेला बाहेर काढण्यात यश आले आहे. उर्वरित लोकांनाही बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या इमारतीत 30 फ्लॅट होते, त्यापैकी 4-5 फ्लॅटमध्ये लोक राहत होते, उर्वरित फ्लॅट्स रिकामे होते. रिपोर्ट्सनुसार, अनेक लोक काम करत होते, तर काही झोपले असताना ते आत अडकले. विशेष म्हणजे ही इमारत 2016 -17 या काळात बांधण्यात आली होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+