Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Budget 2025 : 12 लाखांपर्यंत टॅक्स नाही! आता किती लाखांच्या उत्पन्नावर भरावा लागेल कर घ्या जाणून

अर्थमंत्री निर्माला सीतारमण यांनी सामान्यांसाठी आज मोठी घोषणा केली. या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय आणि नोकरदारांच्या अनेक अपेक्षा होत्या. या अर्थसंकल्पातून आयकरात किती सुट मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, नवीन कर विधेयक पुढील आठवड्यात सभागृहात मांडले जाईल. नवीन कायदा आयकर कायदा, 1961 ची जागा घेईल. आता नवीन करप्रणालीत १२ लाखापर्यंत आयकर लागणार नाही.

budget 2025

काय म्हणाल्या अर्थमंत्री

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक येईल. आयकरावर नवा कायदा करण्यात येणार आहे. त्यात आयकर नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. मात्र, याचा टॅक्स स्लॅबशी काहीही संबंध नाही. 2020 च्या अर्थसंकल्पात जेव्हा सरकारने नवीन कर प्रणाली लागू केली, तेव्हा लोक ती स्वीकारण्यास तयार नव्हते, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले होते. त्यांनी सांगितले की, आयकर दात्यांना जुन्या कर प्रणाली नवीन कर प्रणालीपेक्षा चांगली आणि अधिक फायदेशीर वाटत होती. पण आता देशातील 65 टक्क्यांहून अधिक करदात्यांनी नवीन कर प्रणाली स्वीकारली आहे. म्हणजेच प्रत्येक 3 पैकी 2 लोक नवीन कर प्रणाली अंतर्गत आयकर भरत आहेत. गेल्या एका वर्षात या डेटामध्ये बरेच बदल झाले आहेत.

१२ लाखांपर्यंत कर नाही

केंद्रातील मोदी सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात आत्तापर्यंतची सर्वात मोठी घोषणा केली. नोकरदार वर्गाला मोठं गिफ्ट देताना १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर कोणताही कर आकारला जाणार नाही. याचाच अर्थ १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त राहणार आहे. या घोषणेमुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नवीन कर प्रणाली अंतर्गत सुधारित कर रचना अशी...

  • Budget 2025 Live Updates : सुधारित कर रचनेनुसार, 4 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तींवर कोणताही कर आकारला जाणार नाही. 4 लाख ते 8 लाख रुपये कमावणाऱ्यांवर 5% दराने कर आकारला जाईल.
  • 8 लाख ते 10 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10% कर लावला जाईल.
  • 12 लाख ते 16 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 15% कर लागेल.
  • 16 लाख ते 20 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के कर आकारला जाईल.
  • 20 लाख ते 24 लाख रुपये कमावणाऱ्यांवर 25 टक्के कर आकारला जाईल.
  • तर 24 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30% कर लागेल.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+