Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बजेट २०२४ ; शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा शक्य; किसान सन्मान योजनेचा निधी वाढणार ?

देशाच्या २०२४ साठीच्या अर्थसंकल्पात पीएम किसान सन्मान योजनेचा खर्च ३० टक्के वाढवून या योजनेसाठी ८० हजार कोटी रुपयेची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. सध्या शेतकऱ्यांना प्रतिवार्षिक ६ हजार कोटी रुपये देण्यात येतात, शेतकरी प्रतिनिधींच्या मागणीनुसार ही रक्कम प्रतिवार्षिक ८ हजार पर्यंत वाढविली जाऊ शकते.

१फेब्रुवारी २०२४ मध्ये आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी वित्तीय वर्ष २०२५ साठी अधिक करांचा अंदाज व्यक्त केला होता. २०२५ या वर्षात २२ लाख कोटी रुपये प्रत्यक्ष करांतून तसेच १६. ३१ लाख कोटी रुपये संकलित करण्याचे उद्धीष्ट्य ठेवलं आहे. या वर्षी प्रत्यक्षात हे आकडे वाढण्याची शक्यता आहे.

budget 2024

पूर्ण अर्थ संकल्पात युवक, महिला, ग्रामीण भाग आणि शेतकरी यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. भारतीय किसान संघाचे बद्री नारायण चौधरी यांनी सांगितले की आम्ही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा केली आहे आणि त्यांच्याकडे किसान सन्मान योजनेचे अनुदान ६ हजार रुपये प्रतिवर्ष वरून ८ हजर रुपये प्रतिवर्ष करण्याची मागणी केली आहे. ही रक्कम केंद्र सरकारकडून तीन हप्त्यात वितरीत करण्यात येते.

आर्थिक विकासामुळे सरकारी खर्चात कोणतीही वित्तीय तुट अपेक्षित नाही. महसुलात वाढ झाली आहे आणि भारतीय रिझर्व्ह बँकेला चांगला लाभांश मिळाला आहे जो अपेक्षेपेक्षा अधिक आहे.

सरकारने अंतरिम रथ संकल्पात किसान सन्मान योजनेला ६० हजार कोटी रुपये दिले होते. मात्र जूनच्या शेवटी बजेट पूर्व बैठकांमध्ये शेतकरी प्रतिनिधींनी ही रक्कम वाढविण्याचा आग्रह निर्मला सीतारामन यांच्याकडे धरला आहे. वाढलेल्या महसुलामुळे ही मागणी पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

२०२३ मध्ये रिझर्व्ह बँकेकडून सरकारला ८७ हजार कोटी रुपये इतका लाभांश प्राप्त झाला. २०२५ साली हिच रक्कम २.१ लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. एकूणच झालेली आर्थिक वृद्धी, करांच्या माध्यमातून वाढलेले उत्पन्न आणि रिझर्व्ह बँकेकडून प्राप्त झालेला अतिरिक्त लाभांश यामुळे शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेत अधिक निधी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

त्याच बरोबर अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देणाऱ्या मध्यम वर्गाला अर्थ संकल्पात चांगल्या योजना मिळण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सरकारी बँकांवर देखील अधिक लक्ष देण्यात येईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+