तामिळनाडू हादरले, 'या' मोठ्या नेत्याची हत्या
नवी दिल्ली : मायावती यांच्या बसपा पक्षाचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांची 6 हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केल्याची घक्कादायक घटना समोर आली आहे. घराबाहेर बसले असताना त्यांच्यावर अचानक 6 जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला.

या हल्ल्यात आर्मस्ट्राँग हे रक्तबंबाळ झाले. त्यानंतर उपस्थितांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. हल्लानंतर हल्लेखोर पळून गेले.
ही घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले. दरम्यान, ही घटना घडली त्या परिसरात पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन काय म्हणाले ?
Tamil Nadu CM MK Stalin tweets, "Bahujan Samaj Party State President Armstrong's assassination is shocking and deeply saddening. The police arrested those involved in the murder overnight. I would like to convey my deepest condolences to Armstrong's party, family, relatives and… pic.twitter.com/e0B8gFHIUG
— ANI (@ANI) July 6, 2024
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी ट्विट केले की, "बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांची हत्या धक्कादायक आणि अतिशय दुःखदायक आहे. पोलिसांनी या हत्येमध्ये सहभागी असलेल्यांना रातोरात अटक केली. आर्मस्ट्राँग यांच्या पक्ष, कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रांबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करू इच्छितो.मी पोलिस अधिकाऱ्यांना हे प्रकरण जलदगतीने चालवून कायद्यानुसार दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत."
सरकारने तातडीने दोषींवर कठोर कारवाई करावी- मायावती
बीएसपी तमिलनाडु स्टेट यूनिट के अध्यक्ष श्री के. आर्मस्ट्राँग की आज शाम उनके चेन्नई आवास के बाहर की गयी नृशंस हत्या अति-दुःखद व अति-निन्दनीय। पेशे से वकील श्री आर्मस्ट्राँग राज्य में दलितों की सशक्त आवाज़ के रूप में जाने जाते थे। सरकार दोषियों के खिलाफ अविलम्ब सख्त कार्रवाई करे।
— Mayawati (@Mayawati) July 5, 2024
मायावती यांनी सोशल मीडिया पोस्टवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "बसप तामिळनाडू राज्य युनिटचे अध्यक्ष श्री के. आर्मस्ट्राँगची आज संध्याकाळी चेन्नईतील त्यांच्या निवासस्थानाबाहेर झालेली निर्घृण हत्या अत्यंत दुःखद आणि अत्यंत निषेधार्ह आहे. व्यवसायाने वकील असलेले आर्मस्ट्राँग हे राज्यातील दलितांसाठी खंबीर आवाज म्हणून ओळखले जात होते. सरकारने तातडीने दोषींवर कठोर कारवाई करावी.
असे घडले हत्याकांड
काल सायंकाळी आर्मस्ट्राँग हे आपल्या चेन्नईतील घराबाहेर काही मित्रांबरोबर बसले होते. याचवेळी तीन दुचाकीवरून आलेल्या काही तरुणांनी आर्मस्ट्राँग यांना चाकूचा धाक दाखवायला सुरुवात केली. त्यानंतर आर्मस्ट्राँग यांच्याबरोबर असलेले त्यांचे मित्र पळून गेले. त्यानंतर हल्लेखोरांनी आर्मस्ट्राँगवर यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. आरडाओरडा होताच त्यांचे कुटुंबीय बाहेर आले. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. या हल्ल्यात आर्मस्ट्राँग हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना कुटुंबियांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
कारण गुलदस्त्यात
तामिळनाडूत आर्मस्ट्राँग यांच्या नेतृत्वात बहुजन समाज पक्ष कार्यरत होता. आर्मस्ट्राँग यांची हत्या का करण्यात आली? याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी हल्लेखोरांचा तपास सुरु केला आहे. दरम्यान, हल्ल्याच्या ठिकाणी पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.












Click it and Unblock the Notifications