पुन्हा होणार होता पहलगामसारखा हल्ला? BSF ने उधळला मोठा कट; सापडला शस्त्रांस्त्राचा साठा
सीमा सुरक्षा दलाने पंजाबमधील अमृतसर येथे एक मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला. सीमा सुरक्षा दल (BSF) आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त पथकाने भरपोल गावातून शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि हातबॉम्बचा मोठा साठा जप्त केला. बुधवारी सायंकाळी गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत प्रचंड शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्यात आला.

काय काय सापडले?
बीएसएफ गुप्तचर शाखेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, भरपोळ गावाजवळ संयुक्त शोध मोहीम सुरू करण्यात आली. या कारवाईत सीमावर्ती भागात हा शस्त्रसाठा आढळून आला. तो बीएसएफने जप्त केला. या कारवाईत ३ पिस्तूल, ६ मासिके, ५० जिवंत काडतुसे, २ हातबॉम्ब आदी साहित्य जप्त करण्यात आले. सर्व शस्त्रे आणि दारूगोळा आता स्थानिक पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे.
Punjab | BSF troops in collaboration with Punjab Police recovered a huge cache of arms, ammunition and grenades near Bharopal village in Amritsar district. In a joint search operation conducted yesterday evening, the following items were recovered- 2 hand grenades, 3 pistols and… pic.twitter.com/ffroECtEee
— ANI (@ANI) May 1, 2025
शस्त्रसाठा कसा आला?
भारत-पाकिस्तान सीमेवर ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रांची तस्करी, ग्रेनेड टाकणे आणि अतिरेकी संघटनांना निधी पुरवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ही शस्त्रास्त्रे येथे कशी आली, याचा शोध सुरु आहे. ड्रोनच्या सहाय्याने ही शस्त्रास्त्रे येथे आणली गेली का, हेही तपासणे सुरु आहे. पंजाबला अशांत करण्याचा काही कट होता का, याचाही तपास सध्या सुरु आहे.
पहलगामची पुनरावृत्ती टळली
गेल्या बुधवारीही आयएसआयने ड्रोनद्वारे अमृतसरला पाठवविलेल्या शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्यात आला होता. त्यात साडेचार किलो आरडीएक्स, आयईडी बनविण्यासाठीचे बाँक्स, डेटोनेटर, रिमोट कंट्रोल, बॅटरी, पाच ग्रेनेड आणि एक पिस्तुलाचा समावेश होता. आता पुन्हा शस्त्रे सापडली आहेत. पहेलगाम हल्ल्यासारखा हल्ला पुन्हा करण्याचा दहशतवाद्यांचा प्लॅन होता, याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. बीएसएफने ही कारवाई करत हल्ल्ल्याचा कट मात्र उधळून लावला.












Click it and Unblock the Notifications