Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Video : प्रेयसीला सूटकेसमध्ये घालून हॉस्टेलमध्ये पोहोचला प्रियकर, एका चुकीने कारनामा आला समोर

Boys Hostel Girlfriend in Suitcase video : प्रेमात कोण कधी काय करेल याचा काही नेम नसतो. प्रेमात सर्व काही माफ असतं, असं म्हटलं जात. प्रेमात असल्यावर आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीला भेटण्यासाठी तरुण-तरुणी शक्कल लढवत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. जी सोशल मिडीयावर मोठ्याप्रमाणत व्हायरल होत आहे. एक मुलगा त्याच्या प्रेयसीला सुटकेसमध्ये बसवून मुलांच्या वसतिगृहातील एका खोलीत घेऊन जात होता. पण नंतर असे काही घडले की त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सुटकेसमध्ये घालून एका मुलीला हॉस्टेलच्या गॅलरीतून बाहेर काढले जात असल्याचे दिसून येते. सुटकेसभोवती कर्मचारी आणि वसतिगृहाचे सुरक्षा रक्षक दिसत आहेत. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल होत आहे.

girlfriend boyfriend sonipat video

सुटकेस उघडताच गर्लफ्रेंड बाहेर आली

सोनीपतमधील रथधना रोडवरील एका विद्यापीठातला हा धक्कादायक प्रकार असल्याचे सांगितले जात आहे. एक मुलगा त्याच्या प्रेयसीला ट्रॉली बॅगमध्ये घालून मुलांच्या वसतिगृहातील खोलीत घेऊन जात होता. मग अचानक ट्रॉली बॅग आदळली आणि आत बसलेली मुलगी ओरडली. त्यानंतर ही घटना उघडकीस आहे. त्यावेळी वसतिगृहाच्या सुरक्षा रक्षकांनी ताबडतोब सुटकेस उघडायला लावली तेव्हा सुटेकसच्या आत एक मुलगी आढळली आली. ही मुलगी त्या मुलाची प्रेयसी आहे. सोशल मीडियावर हे प्रकरण समोर आल्यानंतर लोक वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलत आहेत.

लोकांच्या सोशल मिडीयावर मजेशीर कॉंमेट्स

हा व्हिडिओ समोर येताच लोक त्याचा आनंद घेत आहेत आणि सोशल मीडियावर कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, "संपूर्ण जग प्रेमाचे शत्रू आहे." दुसऱ्याने लिहिले, "ही पहिली महिला आहे जी सूटकेसमध्ये जिवंत सापडली आहे. तिचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले पाहिजे." भारतात किती हुशार लोक आहेत." एकाने लिहिले, "तुम्ही तुमचे प्रेम कितीही लपवू शकता पण जगाला ते कळेल." दुसऱ्याने लिहिले, "हे काय आहे, तुझ्या प्रेयसीला सुटकेसमध्ये लपवून हॉस्टेलमध्ये घेऊन जाणे, व्वा भाऊ, काय प्लॅनिंग केले होतेस?" लोक अशा प्रकारे लोक कमेंट करत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+