Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महिला अन् पुरुष एकाच हॉटेल रुममध्ये असतील तर, अर्थ काय? कोर्ट म्हणाले-शारीरिक संबंध मानता येणार नाही

एखादी महिला एखाद्या पुरुषासोबत हॉटेलच्या खोलीत गेली तरी शारीरिक संबंध ठेवण्यास संमती मानता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने हा निर्णय दिलाय. तो नेमका आहे हे जाणून घेऊया‌..!

ट्रायल कोर्टाचा आदेश रद्द

एखाद्या पुरुषासोबत हॉटेलची खोली बुक करून खोलीत प्रवेश करणारी स्त्री शारीरिक संबंध ठेवण्यास तयार आहे असे संमती देत ​​नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आपल्या एका महत्त्वाच्या निर्णयात असे म्हटलेय. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भरत पी. देशपांडे यांनी ही माहिती दिलीय. हा युक्तिवाद देत उच्च न्यायालयाने मार्च २०२१ मध्ये आरोपी गुलशेर अहमदविरुद्धचा खटला बंद केलेल्या बलात्कार प्रकरणातील ट्रायल कोर्टाचा आदेश रद्द केला.

Goa High Court

न्यायालयाने काय म्हटले?

बार आणि Bombay High Court खंडपीठाच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायाधीश म्हणाले की, जरी हे मान्य केले गेले की, महिला पुरुषासोबत खोलीत गेली होती, तरीही ती कोणत्याही प्रकारे शारीरिक संबंध ठेवण्यास तिची संमती मानली जाऊ शकत नाही. कोर्टाने सांगितले की, रूम बुक करण्यात पीडित आणि आरोपी दोघांची भूमिका असल्याचे पुरावे आहेत. परंतु, याला कोणत्याही प्रकारे शारीरिक संबंध ठेवण्याची संमती म्हणून पाहिले जाऊ शकत नाही.

ट्रायल कोर्टाने काय म्हटले?

या बलात्कार Bombay High Court प्रकरणावर सुनावणी करताना ट्रायल कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले होते की, आरोपीसोबत हॉटेलची खोली बुक करण्यात महिलेची महत्त्वाची भूमिका होती आणि ती आरोपीसोबत त्या खोलीतही गेली होती. त्यामुळे, तिने खोलीतील पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास संमती दिली होती. त्यानंतर ट्रायल कोर्टाने डिस्चार्जचे आदेश दिले. या आदेशानंतर आरोपींवरील बलात्काराचा खटला बंद करण्यात आला. मात्र, आता उच्च न्यायालयाने हा आदेश फेटाळून लावला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

बार आणि खंडपीठाच्या Bombay High Court म्हणण्यानुसार, हे संपूर्ण प्रकरण मार्च २०२० मध्ये उघडकीस आले. आरोपीने तिला परदेशात खासगी नोकरीची ऑफर दिल्याचा आरोप महिलेने केला होता. आरोपीने नोकरीसाठी एजन्सीला भेटण्याच्या बहाण्याने महिलेला खोलीत आणून फसवणूक केली होती. पीडितेने आरोप केला आहे की, ती खोलीत शिरताच आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. महिलेच्या म्हणण्यानुसार, जेव्हा आरोपी बाथरूममध्ये गेला तेव्हा तिने खोली आणि हॉटेलमधून पळ काढला आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+