हरियानात भाजप जिंकणार..! फक्त 'हा' एक्झिट पोल ठरला खरा; बाकी सर्व POLLचा 'गुलिगत धोका!'
BJP will win in Haryana only Capital TV exit poll is true : जम्मू आणि काश्मीर आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुकांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले. दोन्ही राज्यांमधील मतदारांची अनेक ठिकाणी अगदी धक्कादायक कौल दिले. हरियाणामध्ये 90 विधानसभा जागांवर सुमारे 67.90% मतदान झाले होते. मागील पंचवार्षिकलाही जवळपास एवढेच मतदान झाले असल्याने सत्ता नेमकी कुणाची येईल, याचे आखाडे बांधले जात होते.
मतदानानंतर बहुतेक एक्झिट पोलने वर्तवविलेल्या अंदाजानुसार यावेळी हरियाणात काँग्रेसच्या मोठ्या विजयाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता. परंतु कॅपिटल टीव्ही नावाच्या एका टीव्ही चॅनलने, हरियाणात भाजप सलग तिसऱ्यांदा सत्ता राखेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला होता. एवढेच नाही, तर प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यावर सर्व एक्झिट पोल खोटे ठरतील, असा दावाही कॅपिटल टिव्हीने केला होता. तो दावाच खरा होत असल्याची सध्यातरी दिसते.

हरियाणात गेल्यावेळीही चुकले होते अंदाज
2019 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोलने भाजपला 61 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला होता. काही एक्झिट पोलने 75-80 जागा जिंकण्याचा अंदाजही वर्तवला होता. मात्र, निकाल एक्झिट पोलपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. परंतु त्यावेळी भाजपला फक्त 40 जागा जिंकता आल्या होत्या.
काँग्रेसला 31 जागा जिंकण्यात यश मिळवले होते. एक्झिट पोलने गेल्यावेळी भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज सांगितला होता. मात्र तो सपशेल चुकला. सी- व्होटरनेही भाजप 72 जागा जिंकेल असा अंदाज वर्तवला होता, तो देखील चुकीचा ठरला होता. यंदाच्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत देखील एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे ठरत असल्याचे दिसून आले.
लोकसभा निवडणुकीतही चुकले होते अंदाज
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अनेक एक्झिट पोलने भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार बहुमताने जिंकेल, असा अंदाज वर्तवला होता. लोकसभा निवडणुकीत एनडीएला 361 ते 401 जागा मिळतील, असा अंदाज अऩेकांनी सांगितला होता. भाजप स्वबळावर बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त जागा जिंकेल, असाही अंदाज एक्झिट पोलने वर्तवला होता. मात्र, एक्झिट पोलचे निकाल चुकीचे ठरले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपला 293 तर एनडीएला 240 जागा मिळाल्या. त्यावेळीही एक्झिट पोल चुकीचे ठरले होते.
हरियाणात कोण सत्ता स्थापन करणार?
सध्या हरियाणात काँग्रेस पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपने मोठी मुसंडी घेतली असून भाजपाची 47 जागांवर आघाडी आहे. तर काँग्रेस केवळ 36 जागांवर आघाडीवर आहे. मात्र निवडणुकीचा निकाल सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. हरियाणात कोण सत्ता स्थापन करणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.












Click it and Unblock the Notifications