Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'भारतात आर्थिक अराजकता निर्माण करायची आहे', हिंडेनबर्गच्या अहवालावर भाजपाची प्रतिक्रिया

Hindenburg New report: प्रसिध्द उद्योगपती गौतम अदानी यांची कंपनी अदानी ग्रुपसमूह आणि बाजार नियामक सेबीचे प्रमुख माधबी पुरी बुच यांच्यातील आर्थिक संबंधाबाबत हिंडेनबर्गने नवीन अहवाल प्रसिद्ध करून देशभरात खळबळ उडवून दिली आहे.

हिंडेनबर्गच्या अहवालावरुन विरोधक आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणावर आता भाजपनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. सेबीचे प्रमुख आणि त्यांच्या पतीने अदानीशी संबंधित ऑफशोर कंपन्यांमध्ये भागीदारी केल्याचा आरोप हिंडेनबर्ग यांनी केला आहे.

Bjp

भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी यांची प्रतिक्रिया

आता या संपूर्ण प्रकरणावर भाजप खासदार आणि प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले, "गेल्या काही वर्षांपासून संसदेचे अधिवेशन सुरू होते तेव्हा काही परदेशी अहवाल प्रसिद्ध केले जातात. संसदेच्या अधिवेशनापूर्वी बीबीसीची एक डॉक्युमेंटरी प्रसिद्ध झाली होती. संसदेच्या अधिवेशनाच्या दरम्यान हिंडनबर्गचा अहवाल आला होता. या सर्व घटना जानेवारीमध्ये घडल्या आहेत."

ते पुढे म्हणाले की, विरोधकांचे विदेशात असे काही कनेक्शन आहेत की ते भारताच्या संसदेच्या प्रत्येक अधिवेशनात अस्थिरता आणि अराजकता निर्माण करतात. त्यांना संभ्रम पसरवून भारतात आर्थिक अराजकता निर्माण करायची आहे. आता ते सेबीवर हल्लाबोल करत आहेत. काँग्रेस गेल्या 30-40 वर्षांपासून विदेशी कंपन्यांच्या पाठीशी का उभी राहिली? असा प्रश्न ही त्रिवेदी यांनी उपस्थितीत केला आहे.

अहवालात काहीही विश्वासार्ह नाही - माजी केंद्रीय मंत्री

सेबी प्रमुख आणि त्यांचे पती यांच्यावर आरोप असलेल्या हिंडेनबर्गच्या अहवालावर भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले, "हे केवळ तर्क आणि अंदाज आहेत, ज्यांना सत्याच्या काही घटकांसह जोडले जात आहे. त्यामागे एक विशेष योजना आहे. "गेल्या दहा वर्षांत काँग्रेसने खोट्याच्या राजकारणाची रणनीती अवलंबली आहे. आता देशाची आर्थिक व्यवस्था अस्थिर करण्यासाठी आणि स्वतंत्र नियामक सेबीवर हल्ला करून देशात अराजकता माजवण्यासाठी परकीयांची मदत घेत आहे."

विरोधक आक्रमक

हिंडेनबर्ग अहवालावरून टीएमसी आणि काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, सेबी प्रमुख आणि त्यांच्या पतीवरील आरोप गंभीर आहेत. अशा आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+