भाजप आमदार श्रेयसी सिंह यांची ऑलिम्पिकसाठी निवड
नवी दिल्ली : तीव्र इच्छाशक्ती आणि अथक मेहनतीच्या जोरावर तुम्ही तूम्हाला हवं असणार यश खेचून आणू शकतात. हे आपण ऐकत आणि पाहत आलेलो आहोत. असचं काहीस घडलं आहे ते म्हणजे बिहारमधील भाजप आमदार आणि खेळाडू श्रेयसी सिंह यांच्या सोबत.

श्रेयसी सिंह यांची ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. त्यांनी राजकारणासोबतच, क्रिडाक्षेत्रात आपलं दुहेरी करीअर घडवलं आहे. त्यांच्या या यशाचं देशभरात कौतूक केल जात आहे. पॅरिस ऑलम्पिक 2024 मध्ये शॉटगन ट्रॅप स्पर्धेत श्रेयसी सिंह यांची निवड झाली आहे. 17 वर्षांच्या अथक मेहनतीनंतर श्रेयसी हिची ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. अर्जुन पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ऑलम्पिकमध्ये खेळणारी श्रेयसी ह्या पहिल्या बिहारी आहेत.
श्रेयसी सिंह कोण आहेत, त्यांचं शिक्षण काय?
बिहारमधील जमुई या विधानसभा मतदारसंघातून श्रेयसी आमदार आहेत. 29 ऑगस्ट 1991 मध्ये नवी दिल्लीमध्ये त्यांचा जन्म झाला होता. शूटर श्रेयसी या बिहारमधील राजघराण्यातील सदस्य आहेत. श्रेयसी या आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेमबाज आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेतही त्यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. श्रेयसी या माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंग यांची मुलगी आहे. त्यांची आई पुतुल सिंग याही खासदार राहिल्या आहेत. श्रेयसी यांना राजकारणाचा वारसा त्यांच्या घराण्यातून मिळाला आहे. श्रेयसी यांनी दिल्लीच्या हंसराज कॉलेजमधून आर्ट्सचे शिक्षण घेतले आणि मानव रचना इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, फरिदाबाद येथून एमबीए पूर्ण केलं.
श्रेयसी सिंह 2020 मध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी झाल्या आणि लगेचच त्यांना 2020 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जमुईमधून तिकीट दिलं. जिथून त्या चांगल्या मतांनी विजयी झाल्या. श्रेयसी सिंगचे आजोबा कुमार सेरेंद्र सिंग आणि वडील दिग्विजय सिंग हे दोघेही त्यांच्या काळात नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते. श्रेयसी सिंह बिहारच्या जमुई जिल्ह्यातील गिधौरची रहिवासी आहे.
श्रेयसी सिंग या खेळातल्या दुहेरी सापळ्यात भाग घेतात. डबल ट्रॅप हा शॉटगन शूटिंग गेम आहे. त्यांनी गोल्ड कोस्ट,ऑस्ट्रेलिया येथे 2018 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत त्यांनी सुवर्णपदक जिंकले आहे.तसेच स्कॉटलंडमधील 2014 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. श्रेयसी सिंग 2013 मध्ये मेक्सिकोतील अकापुल्को येथे झालेल्या ट्रॅप नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताकडून खेळण्यासाठी गेल्या होत्या. जिथे त्यांनी 15 वा क्रमांक पटकावला होता. 2010 कॉमनवेल्थ गेम्समध्ये एकेरी आणि पेअर ट्रॅप स्पर्धेत भाग घेतला. श्रेयसी सिंग सिंगल्स ट्रॅप स्पर्धेत 6व्या तर पेअर ट्रॅप स्पर्धेत 5व्या स्थानावर आहे.
श्रेयसी सिंगने 2014 मध्ये ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत एकेरी, दुहेरी ट्रॅप स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आणि अंतिम फेरीत 92 गुण पूर्ण केले. त्याच वर्षी, तिने इंचॉन येथे 2014 आशियाई क्रीडा स्पर्धेत शगुन चौधरी आणि वर्षा वर्मन यांच्यासोबत डबल ट्रॅप सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. श्रेयसी सिंगने 2017 मध्ये बिहारचे प्रतिनिधित्व करत 61 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
-
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
Kuldeep yadav wedding date : कुलदीप यादव बोहल्यावर चढणार! कोण आहे होणारी पत्नी वंशिका? जाणून घ्या -
पुरुषांनो, 'या' 5 सामान्य लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; असू शकतो वाढलेल्या प्रोस्टेटचा धोका!










Click it and Unblock the Notifications