वायनाड लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार जाहीर; जाणून घ्या- प्रियांका गांधींविरुद्ध कोण लढणार?
झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्याचबरोबर, 8 राज्यांतील 25 विधानसभा जागांच्या व एका ठिकाणच्या लोकसभा पोटनिवडणुकांसाठी देखील भाजपने शनिवारी संध्याकाळी उमेदवाराची यादी जाहीर केली.
यामध्ये केरळच्या 24 विधानसभा जागा आणि वायनाड लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. भाजपने वायनाडमधून नव्या हरिदास यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रियांका गांधी यांच्याशी नव्या यांचा सामना होणार आहे.

14 राज्यात 48 विधानसभेसाठी पोटनिवडणूक
14 राज्यांतील 48 विधानसभा आणि 2 लोकसभेच्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघासह 13 राज्यांतील 47 विधानसभा जागांसाठी 13 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा आणि उत्तराखंडच्या केदारनाथ विधानसभेच्या जागेवर 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला सर्व निकाल लागणार आहेत.
महाराष्ट्रात एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या देखील घोषणा करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहेत. तर मविआ आणि महाविकास आघाडीच्या वतीने जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला दिसत नाही.
13 नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान
झारखंडमध्ये 13 नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील उमेदवारी प्रक्रिया 25 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. यानंतर 28 ऑक्टोबर रोजी कागदपत्रांची छाननी होणार आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना नावे मागे घेता येतील. तसेच दुसऱ्या टप्प्यासाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. याबाबतची अधिसूचना 22 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात येणार आहे. नामांकनाची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर असेल. दुसऱ्या टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी 30 ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. 1 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना नावे मागे घेता येतील. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.












Click it and Unblock the Notifications