Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ठरलं! बिहारमध्ये या दिवशी होणार विधानसभा निवडणुका; मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली 'डेडलाईन'!

Bihar Vidhan Sabha Election 2025 date : बिहारच्या राजकारणाचे केंद्र आता पाटणा येथील मुख्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे वळले आहे! राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघालं असतानाच, मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी विधानसभा निवडणुका कधी होणार याबद्दलची 'डेडलाईन' स्पष्ट केली आहे.

२२ नोव्हेंबर २०२५ रोजी विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्याने, त्याआधी २४३ जागांसाठी होणारी निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाईल! असे ज्ञानेशकुमार यांनी सांगितले.

Bihar Vidhan Sabha Election 2025 date

आजपासून आचारसंहिता लागणार?

याचा थेट अर्थ असा की, निवडणुकीच्या तारखांची घोषणा आता कोणत्याही क्षणी होऊ शकते! ६ किंवा ७ ऑक्टोबर दरम्यान, किंवा पुढील आठवड्यात कधीही आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता असल्याने, बिहारमध्ये निवडणुकीचा 'रणसंग्राम' सुरू होण्यासाठी आता काही दिवसांचाच अवधी शिल्लक आहे!

Take a Poll

कधी होणार निवडणुका?

बिहारमधील राजकीय वातावरण पूर्णपणे तापले असतानाच, विधानसभा निवडणुका कधी होणार याबद्दलची मोठी माहिती खुद्द मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी दिली आहे. रविवार (५ ऑक्टोबर) रोजी पाटणा येथे आयोजित पत्रकार परिषदेत, त्यांनी स्पष्ट केले की, २२ नोव्हेंबर २०२५ रोजी बिहार विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्याने, त्यापूर्वीच २४३ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

निवडणुकीच्या तारखांची घोषणा कधीही होऊ शकते, असे स्पष्ट संकेत CEC यांनी दिले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ६ किंवा ७ ऑक्टोबर दरम्यान किंवा पुढील आठवड्यात कोणत्याही दिवशी तारखा जाहीर होण्याची आणि आदर्श आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे.

मतदान प्रक्रिया होणार अधिक पारदर्शक

यावेळी बिहारमध्ये मतदानाची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी अनेक नवीन सुधारणा लागू करण्यात आल्या आहेत, ज्या आता देशभरात लागू करण्याचा आयोगाचा विचार आहे.

निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख घोषणा

मतदान कधी? - निवडणूक दोन टप्प्यांत होण्याची शक्यता आहे. ३ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२५ दरम्यान मतदानाची शक्यता वर्तवली जात आहे.

मतदान केंद्रावर मोबाईल नेण्याची मुभा: यावेळी मतदार मतदान केंद्रापर्यंत मोबाईल घेऊन जाऊ शकतील, मात्र मतदानासाठी आत जाताना तो जमा करावा लागेल.

१०० टक्के वेबकास्टिंग

  • बिहारमधील शंभर टक्के (१००%) मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग केली जाईल, जेणेकरून निवडणुकीत पूर्णपणे पारदर्शकता राखता येईल.
  • EVM - इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर उमेदवारांचे रंगीत फोटो आणि मोठ्या फॉन्टमध्ये अनुक्रमांक दिसतील.
  • 'वन स्टॉप डिजिटल प्लॅटफॉर्म' मतदानाशी संबंधित सर्व माहिती एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल.

नवीन आणि जुने दोन्ही वोटर कार्ड चालणार!

CEC ज्ञानेश कुमार यांनी मतदारांच्या ओळखपत्राबद्दल एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट केला आहे. ज्या मतदारांच्या कार्डमध्ये बदल झाले आहेत, त्यांना १५ दिवसांत नवीन कार्ड मिळेल. मात्र, ज्यांच्या डेटामध्ये कोणताही बदल नाही, असे मतदार जुने वोटर कार्ड वापरूनही मतदान करू शकतील. याव्यतिरिक्त, अन्य वैध ओळखपत्रेही मतदान करण्यासाठी ग्राह्य धरली जातील.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+