निवडणुकीपूर्वीच बिहार विधान परिषदेत राडा; नितिश कुमार- राबडीदेवीमध्ये हमरी-तुमरी, वाद वाढला
बिहार विधान परिषेदत मंगळवारी जोरदार राडा पहायला मिळाला. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि विरोधी पक्षनेत्या राबडी देवी यांच्यात पुन्हा एकदा जोरदार वाद झाला. सभागृहात राजद आमदारांनी घातलेले बॅज पाहून मुख्यमंत्री नितीश कुमार इतके संतापले की त्यांनी थेट माजी मुख्यमंत्री राबडी देवींवर निशाणा साधला. पक्ष तुमचा नाही, तुमच्या पतीचा आहे, तुम्ही गप्प राहा! असे म्हणत नितिश कुमार यांनी संताप व्यक्त केला.

नेमका कशामुळे झाला गोंधळ?
आज आरडेडीचे आमदार हिरवे कपडे घालून सभागृहात पोहोचले होते. तेजस्वी सरकारने मागासवर्गीयांसाठी आरक्षण वाढवले होते. परंतु भाजप सरकार येताच ते हिसकावून घेण्यात आले, असे या कपड्यांवर लिहिलेले होते. मुख्यमंत्री नितीश कुमार यांना हे आवडले नाही. २०२३ मध्ये जेव्हा आरक्षण वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा ते स्वतः सरकारचा भाग होते. तथापि नंतर पाटणा उच्च न्यायालयाने ते फेटाळून लावले.मात्र या प्रकारामुळे मुख्यमंत्री नितीश कुमार संतापले. त्यांनी एका आरजेडी आमदाराला सभागृहात उभं करत, बघा हा तमाशा, फक्त या पार्टीतच घडू शकतो! असे म्हणत राग व्यक्त केला.
राबडी- नितिशकुमार भिडले
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजदवर टीका केली तेव्हा विरोधी पक्षनेत्या आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी उभ्या राहिल्या. त्यांनी निषेध करण्यास सुरुवात केली. पण नितीश कुमार यांनी त्यांनाही फटकारले. तुम्ही या प्रकरणात अडकू नका. ही पार्टी तुमची नाही, तुमच्या नवऱ्याची आहे! असं म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनीही उभे राहून समर्थन केले की आरक्षण वाढवण्याचा निर्णय नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला.
नितिशकुमारांचा हल्लाबोल
नितीश कुमार यांनी राबडी देवींवर आणखी हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ही बिचारी महिला तिच्या पतीच्या पाठिंब्याने सत्तेत आली. १९९७ चा संदर्भ देत ते म्हणाले की, जेव्हा सीबीआयने चारा घोटाळ्यात लालू प्रसाद यादव यांच्यावर आरोप निश्चित केले तेव्हा त्यांनी मुख्यमंत्रिपद त्यांच्या पत्नीकडे सोपवले. पडद्यामागून तेच सरकार चालवत राहिले. नितीश कुमार यांच्या या विधानानंतर राजद आमदारांमध्ये नाराजी पसरली आणि त्यांनी सभागृहाबाहेरील पायऱ्यांवर निदर्शने सुरू केली.
लालूच्या मुलीने व्यक्त केला राग
मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी राबडी देवी यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर लालूप्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य मैदानात उतरली. त्यांनी भोजपुरीत ट्विट करत नितिश कुमार यांच्यावर पलटवार केला. "अरे तू चुप्प रहअ न .. जादा मुंह मत फाड़$अ .. तोहरा त$अ बोले के मुंह नय हो.. तू ओकरे गोदी में जा बईठलअ जे तोहर डीएनए में खोट बतईल को .. आऊर तू त$अ सही... अशा शब्दांत त्यांनी राग व्यक्त केला.












Click it and Unblock the Notifications