'गांजा ओढू नका, जर तुम्हाला तो ओढायचाच असेल तर...' प्रशांत किशोर लोकांना हे काय शिकवत आहेत?'
Prashant Kishor: बिहार विधानसभा निवडणूकीच्या तयारीला आता सर्व पक्षाला लागले आहे. या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूका आहेत. आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिध्द निवडणूक रणनीतीकार व जन सूराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांची शुक्रवारी पटना या शहरात एक रॅली होती. या रॅलीतील त्यांचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओची वनइंडिया मराठी कोणतेही पुष्ठी करत नाही.

या रॅलीतून प्रशांत किशोर आपल्या कार्यकर्त्यांना शिस्तीचे धडे देत होते, परंतु त्यांनी त्यात जे काही सांगितले त्याची चर्चा आता बिहारच्या राजकीय वर्तुळात होत आहे. या व्हिडिओमध्ये प्रशांत किशोर म्हणत आहेत की, "शारीरिकदृष्ट्या मजबूत राहा, मन सतर्क असले पाहिजे. तरच 11 तारखेला ओढा. 11 तारखेलाच तो करायचा आहे.
आज रात्री ते करायचं नाही. रात्रभर गावकऱ्यांसोबत बसून गांजा ओढू नका. हा चाचाचा नियम आहे. जर दारूवर बंदी असेल तर लिट्टी चोखा नंतर गांजा ओढण्याचे सत्र सुरू करू नका. इतके शिस्तबद्ध राहा की, जरी तुम्हाला गांजा ओढावा लागला तरी 11 तारखेपर्यंत धीर धरावा लागेल. अशा प्रकारे, कोणीही धूम्रपान करू नये," असं त्यानी म्हटलं आहे.
प्रशांत किशोर अगर बुरा न माने तो उनको कहना चाहूंगा..प्रशांत जी , बिहार बदलाव रैली भी गांजे के पत्तों की तरह ही फुंक गई. मैने आपसे सवाल किया कि रैली में लोग नहीं पहुंचे इसलिए आप पदयात्रा में जा रहे हैं क्या? आपने कहा आप तो देखे ही कि लोग आए हैं कि नहीं. हम सुबह से यहीं थे प्रशांत… pic.twitter.com/ItXqGjAq3v
— Bharat Suraj (@bharatsuraj01) April 11, 2025
पुढे बोलताना प्रशांत किशोर म्हणाले की "जन सूरजचे कुटुंब इतके मोठे आहे की, जर त्यांना एकत्र यायचे असेल तर त्यांना गांधी मैदानात बसावे लागेल. सभेचे नाव बदलाव रॅली आहे. मी दोन वर्षे चालत आहे आणि त्यात मी सर्वात जास्त बदलाव हा शब्द ऐकला आहे.
बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला बदल हवा आहे. एक नवीन राजकीय पर्याय हवा आहे. जनसुराजची काम करण्याची पद्धत इतर पक्षांपेक्षा वेगळी आहे. आपले कार्यकर्ते येऊन कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने करतील आणि सामान्य लोकांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची खात्री करतील. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक त्यांच्या गांजावरील विधानाची जास्त चर्चा करत आहेत.












Click it and Unblock the Notifications