Bihar Election 2025 : फलोदी सट्टा बाजाराचा मोठा अंदाज! बिहार विधानसभा निवडणुकीत 'या' पक्षाची सत्त
Bihar Election 2025 Phalodi Satta Bazar Predicts : बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Election 2025) मतदानाची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना, निवडणुकीच्या निकालापूर्वीच राजस्थानच्या प्रसिद्ध फलोदी सट्टा बाजारात मोठी खळबळ माजली आहे. राजकीय पक्षांचे दावे आणि प्रतिदावे सुरू असताना, सटोडियांनी मात्र NDA (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) सरकार पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता सर्वाधिक वर्तवली आहे.

एकीकडे बिहार निवडणुकीचे अंदाजही सर्वेक्षणाच्या माध्यमातून निरनिराळ्या संस्थांनी जारी केले आहेत. त्यानुसार बिहारमध्ये पुन्हा नितीश राज येईल असा सर्वेक्षणाचा अंदाज आहे असे असले तरीही काही सर्वेमध्ये भाजप नितीश कुमार यांना झटका बसू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला होता. दरम्यान, जनसुराज पक्षानेही या निवडणुकीत पहिल्यांदाच कंबर कसली आहे हा पक्ष राजकीयदृष्ट्या मात्तब्बर पक्षांना हादरे देऊ शकतो अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता आगामी दोन टप्प्यात होणारी बिहार निवडणूक चुरशीची होईल यात दुमत नाही.
दरम्यान, आता सट्टाबाजारातील संबंधितांनीही आपापले अंदाज व्यक्त केले आहे. यानुसार, बिहारमध्ये नितीशपर्व पुन्हा येईल असाच काहीसा अंदाज आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाला तसेच महाआघाडीला झटका बसेल का हेही दिसून येईल.
काय सांगतो सट्टा बाजाराचा अंदाज
फलोदी सट्टा बाजारात कमी 'भाव' म्हणजे विजयाची अधिक शक्यता मानली जाते. सध्या मुख्यमंत्री पदासाठी नीतीश कुमार यांचा भाव ४० ते ४५ पैशांच्या दरम्यान आहे. हा कमी भाव स्पष्टपणे दर्शवतो की, सटोडियांच्या अंदाजानुसार, नीतीश कुमार हेच मुख्यमंत्री पदावर कायम राहण्याची शक्यता सर्वाधिक आहे.
भाजप-जेडीयुला सारख्याच जागा मिळणार
सट्टा बाजारानुसार, भाजप आणि जेडीयू यांच्या जागा जवळपास समान राहण्याची शक्यता आहे, तर महागठबंधनमध्ये आरजेडी सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो, परंतु बहुमतापासून दूर राहील.
फलोदी सट्टा बाजाराचा पक्षांनुसार जागांचा अंदाज
१. भाजप (BJP)
लढवणाऱ्या जागा: १०१
अपेक्षित जागा: ६६ ते ६८
२. जेडीयू (JDU)
लढवणाऱ्या जागा: १०१
अपेक्षित जागा: ५४ ते ५६
३. आरजेडी (RJD)
लढवणाऱ्या जागा: १४३
अपेक्षित जागा: ६९ ते ७१
४. काँग्रेस (Congress)
लढवणाऱ्या जागा: कमी जागा
अपेक्षित जागा: खूपच कमी
फलोदी सट्टा बाजाराचा बिहार निवडणुकीचा 'एकमेव' आणि स्पष्ट अंदाज
१. आकडेवारी काय सांगतेय..
एनडीए (राष्ट्रीय लोकशाही आघाडी): १२८ ते १३४ जागा (एकूण २४३ पैकी)
महाआघाडी (महागठबंधन): ९३ ते ९९ जागा (एकूण २४३ पैकी)
२. बहुमत स्थिती
- NDA (राष्ट्रीय लोकशाही आघाडी): स्पष्ट बहुमत (बहुमतासाठी आवश्यक १२२ जागा)
- महागठबंधन (Mahagathbandhan): बहुमतापासून दूर












Click it and Unblock the Notifications