Bihar Election 2025 बिहारमध्ये उद्या पहिल्या टप्प्याचे मतदान; ओपिनियन पोलचे धक्कादायक आकडे! आले समोर
Bihar Election 2025 Opinion Poll : बिहार विधानसभा निवडणूक २०२५ च्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आता थांबला असून, उद्या, ६ नोव्हेंबरला राज्यातील १२१ जागांवर मतदान होणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील NDA (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन (Grand Alliance) यांच्यात मुख्य लढत आहे. एकूण २४३ जागा असलेल्या बिहारमध्ये सत्ता स्थापनेसाठी १२२ जागांचा मॅजिक नंबर गाठणे आवश्यक आहे.

बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या आदल्या दिवशी MATRIZE-IANS ने एक धक्कादायक ओपिनियन पोल (Opinion Poll) जाहीर केला आहे, ज्यामुळे महागठबंधनमध्ये मोठी अस्वस्थता पसरण्याची शक्यता आहे.
ओपिनियन पोल: NDA ला मोठे बहुमत, पण RJD ची जोरदार टक्कर
MATRIZE-IANS च्या ओपिनियन पोलनुसार, सध्या NDA चे पारडे जड दिसत आहे. जनतेला थेट 'बिहारमध्ये कोणाची सरकार बनत आहे?' असा प्रश्न विचारला असता, मतदारांनी दिलेला कल ओपिनीयन पोलच्या स्वरुपात दिसून आला आहे.
- ओपिनियन पोल: आघाडीनुसार जागा मिळण्याची शक्यता (एकूण २४३)
- राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA): १५३ - १६४
- महागठबंधन (MGB): ७६ - ८७
- जन सुराज (Jan Suraj - PK): १ - ३
- एआयएमआयएम (AIMIM): १ - २
- इतर (Others): ० - ४
पक्षांनुसार जागांचे विश्लेषण:
या पोलनुसार, भाजपला (BJP) ८३-८७ जागा मिळण्याची शक्यता असून, राष्ट्रीय जनता दलाला (RJD) ६२-६६ जागा मिळू शकतात. सत्ताधारी जेडीयू (JDU) ६१-६५ जागांवर समाधान मानू शकतो, तर काँग्रेसला ७-९ जागा मिळण्याचा अंदाज आहे. राजद आणि जेडीयूमध्ये जागांच्या बाबतीत काट्याची टक्कर दिसत आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी नितीश कुमार पहिली पसंती
- ओपिनियन पोलनुसार, बिहारच्या जनतेची मुख्यमंत्रीपदासाठी पहिली पसंती नितीश कुमार हेच आहेत.
- नितीश कुमार: ४६% जनता मुख्यमंत्री म्हणून त्यांना पाहू इच्छिते.
- तेजस्वी यादव: १५% जनता त्यांना मुख्यमंत्रीपदावर पाहू इच्छिते.
- चिराग पासवान (Chirag Paswan): ८% लोकांची पसंती
- प्रशांत किशोर (PK): ८% लोकांची पसंती
बिहार विधानसभा निवडणूक २०२५ वेळापत्रक
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांत होणार आहे आणि निकाल १४ नोव्हेंबरला जाहीर होतील.
- टप्पा जागांची संख्या : मतदानाची तारीख
- पहिला : टप्पा १२१ जागा : ६ नोव्हेंबर २०२५ (उद्या)
- दुसरा टप्पा :१२२ जागा : ११ नोव्हेंबर २०२५
- मतमोजणी :(दोन्ही टप्पे) : १४ नोव्हेंबर २०२५












Click it and Unblock the Notifications