दिल्ली मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला नितीश कुमार उपस्थित राहणार नाहीत, राजकीय वर्तूळात चर्चांना उधाण

Bihar CM Nitish Kumar Will Not Attend Delhi CM Oath Ceremony: दिल्ली विधानसभा निवडणूकीत तब्बल 27 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर भाजपाला मोठा विजय मिळवला आहे. या निवडणूकीत 70 पैकी 48 जागा जिंकून भाजपाला सत्ता मिळाली आहे. दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे.

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील रामलीला मैदानावर उद्याच्या दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तयारी सुरु आहे. नवनिर्वाचित भाजप आमदारांची बैठक बुधवारी (19 फेब्रुवारी) सायंकाळी आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीत निर्णय झाल्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

Nitish Kumar

दिल्लीच्या मुख्यमंत्र्‍यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप आणि एनडीएचे वरिष्ठ नेते उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. समारंभानंतर एनडीएच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि नेत्यांसाठी सामुदायिक जेवणाचेही नियोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री उपस्थित राहणार आहेत. मात्र बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत.

बिहाराचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची 20 आणि 21 फेब्रुवारी रोजी होणारी प्रगती यात्रा असल्याने ते दिल्ली मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थितीत राहणार नाहीत. नितीश कुमार सरकारचे प्रतिनिधी म्हणून बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार आहेत.

जेडीयूचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संजय झा आणि केंद्रीय मंत्री लल्लन सिंह या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री विजय सिन्हा आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हजर राहणार आहेत. तर काही मुख्यमंत्री त्यांच्या राज्यांमध्ये अर्थसंकल्पाच्या अडचणी आणि विधानसभा अधिवेशनांमुळे बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत. या अनुपस्थितींबद्दल भाजपला माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उद्याच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थितीत राहणार नसल्याने देशाच्या राजकीय वर्तूळात चर्चा सुरु आहे की, प्रगती यात्रा हे निमित्त आहे की आणखी काही शिजत आहे. हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+