60 वर्षीय मामांवर जडला होता जीव, म्हणून 27 वर्षीय भाचीने पतीचेच केले कांड; घटनेनं औरंगाबाद हादरलं!
Wife Murders Husband For Uncle Love : इंदूरच्या सोनम रघुवंशीने तिचा पती राजा रघुवंशीची ज्या पद्धतीने प्लॅनिंग करून हत्या केली. अगदी तशीच घटना बिहारमध्येही समोर आली आहे. बिहारच्या औरंगाबादमधील ही धक्कादायक घटना आहे.
भाचीने मामा सोबत असलेल्या प्रेम संबंधातून थेट महिन्याभरापूर्वी ज्याच्यासोबत लग्न झाले होते, त्या पतीलाच संपवले. या घटनेने बिहार राज्य हादरलं आहे एका 27 वर्षीय भाचीने तिच्या 60 वर्षीय मामाच्या प्रेमापोटी तिच्या पतीचे षडयंत्र रचून हत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, 24 जून रोजी 27 वर्षीय प्रियांशू उर्फ छोटूची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. प्रियांशू आणि गुंजाचे लग्न 21 मे रोजी झाले. मुलीने लग्नाच्या मंडपातच तिच्या पतीच्या हत्येची योजना आखली. लग्नाच्या सुमारे 1 महिन्यानंतर, पत्नीने एका शूटरला कामावर ठेवले आणि तिच्या पतीची हत्या केली.
प्रियकर मामा झालाय फरार!
2 जुलै रोजी पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली. तर आरोपी तरुणीचा मामा तथा तिचा प्रियकर जीवन सिंग फरार आहे. दोघांनीही हत्येसाठी झारखंडमधील दोन शूटरना सुपारी दिली होती. पोलिसांनी जयशंकर चौबे आणि मुकेश शर्मा या दोन्ही शूटरनाही अटक केली आहे.

60 वर्षीय मामावर जडले होते प्रेम!
पोलिसांनी सांगितले की, आरोपी गुंजा ही लहानपणापासून तिच्या आत्याच्या घरी राहत असे. तिथेच शिकली. या काळात ती तिच्या आत्याचा नवरा म्हणजे नात्याने मामा असलेल्या व्यक्तीच्या प्रेमात पडली. तिच्या वयाच्या दुप्पट तिच्या मामाचे वय होते, पण ती प्रेमात पूर्णपणे आंधळी झाली.
तिच्या आत्याला तिच्या व पतीच्या नात्याबद्दल कधीही शंका आली नाही. एप्रिलमध्ये आत्याने आम्हाला एकत्र पाहिले. ही बातमी घरी पसरली. त्यानंतर वडील मुलगा शोधू लागले. एका महिन्यातच तिचे लग्न झाले. २१ मे रोजी गुंजाच्या संमतीशिवाय तिचे प्रियांशूशी लग्न लावले गेले. परंतु या नात्यावर ती खूश नव्हती. तिने मामाला पळून जाऊ असा सल्ला दिला होता. पण त्यांनी रिप्लाय दिला नाही, तसेच गुंजाचे यापूर्वी दोन लग्न मोडलेले होते.
मंडपातच पतीच्या हत्येचा कट रचला गेला!
'समाजाच्या आणि वडिलांच्या सन्मानाच्या भीतीने गुंजाने प्रियांशशी लग्न केले. परंतु, तिने पतीला ठार मारण्याचा प्रण मंडपातच केला. मामासोबत तिचे फोनवरून संपर्क सुरू होता. त्यानंतर दोघांनी प्रियांशला कसे मारायचे याचा प्लॅन आखला. त्यानंतर मामाने मित्राशी बोलून झारखंडमधील दोन शूटर्सना कामावर ठेवले.
शूटर्सना पतीचा दिला ठावठिकाणा!
'प्रियांशू कुमार सिंह 24 जूनच्या रात्री वाराणसीतील चंदौली येथील त्यांच्या नातेवाईकाच्या घरातून ट्रेनने परतत होता. येताना तो बायकोला त्याचे लोकेशन सातत्याने सांगत असे. तिच माहिती तिने गुंजा हीने शूटर्सला दिली. गावातील दोन मुले त्याला घेण्यासाठी स्टेशनवर गेलेली होती. नवीनगर पोलिस स्टेशन परिसरातील लेम्बोखाप गावाजवळ शूटर्सनी त्याची गाडी थांबवली आणि त्याच्यावर चार गोळ्या झाडल्या. त्यात प्रियांशू जागीच ठार झाला.
अशा प्रकारे संपूर्ण प्रकरण उघड झाले
गावातील दोन्ही मुलांना सोडल्यानंतर पोलिसांनी प्रियांशुचा मोबाईल तपासला. फोनवरून हत्येपूर्वी गुंजाशी झालेल्या संभाषणाचे स्पष्टीकरण मिळाले. प्रियांशुचे कॉल डिटेल्स मिळवण्यात आले. तो सतत गुंजाच्या संपर्कात असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी गुंजाचे कॉल डिटेल्स मिळवले आणि त्यांना एक नंबर सापडला ज्यावर तिने 50 ते 60 पेक्षा जास्त वेळा कॉल केले होते. पोलिसांनी गुंजाला फोन मागितला तेव्हा ती नकार देऊ लागली. संशय अधिकच वाढला आणि पत्नीला ताब्यात घेण्यात आले. जेव्हा गुंजाला पोलिसांनी खाक्या दाखवल्या, तेव्हा तिने संपूर्ण कटाची कबुली दिली.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!








Click it and Unblock the Notifications