केंद्रीय सशस्त्र दलात माजी अग्निविरांसाठी 10 टक्के कॉन्स्टेबलची पदे राखीव, गृह मंत्रालयाची घोषणा
नवी दिल्ली - केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात माजी अग्निवीरांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठे पाऊल उचलले आहे. केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात 10 टक्के कॉन्स्टेबलची पदे माजी अग्निविरांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. विशेषतः या भरतीत माजी अग्निविरांसाठी शारीरीक चाचणी आणि वयोमर्यादेत सुट दिली आहे.
अग्निविरांना मोठा दिलासा
सीआयएसएफच्या महासंचालाक नीना सिंह यांनी सांगितले की, आता कॉन्स्टेबल भरतीतील 10 टक्के पदे माजी अग्निविरांसाठी राखीव राहतील. तसेच या माजी अग्निवीरांना सीआयएसएफच्या भरतीत शारीरिक चाचणीत सूट दिली जाईल. या निर्णयामुळे अग्निवीरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या भरतीत प्रथम वर्षात पाच वर्षांची सुट मिळणार आहे, त्यानंतर आगामी वर्षांसाठी तीन वर्षांची सुट राहील असेही त्या म्हणाल्या. या निर्णयामुळे सीआयएसएफसाठी सक्षम, योग्य प्रशिक्षित मनुष्यबळ मिळणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
वयोमर्यादेत सूट
नीना सिंह म्हणाल्या, माजी अग्निवीरांना वयोमर्यादेत सूट मिळेल. केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात भरती झाल्यास प्रशिक्षित, सक्षम आणि पात्र मनुष्यबळ माजी अग्निवीरांच्या माध्यमातून मिळेल. अग्नीवार आधीच प्रशिक्षत असल्यामुळे सीआयएसएफमध्ये शिस्तबद्ध उमेदवार मिळेल. तसेच या माजी अग्निवीरांनाही सीआयएसएफ सेवेची संधी मिळणार आहे.
Union Home Ministry has taken a big step of recruiting, Ex Agniveers in Central Armed Police Forces. In this regard, CISF has also made all arrangements. 10% vacancies of constables will be reserved for Ex Agniveers. Additionally, they will be given relaxation in Physical… pic.twitter.com/y6AtTvAVU7
— DD News (@DDNewslive) July 11, 2024
Union Home Ministry has taken a big step of recruiting, Ex Agniveers in Central Armed Police Forces. In this regard, CISF has also made all arrangements. 10% vacancies of constables will be reserved for Ex Agniveers. Additionally, they will be given relaxation in Physical… pic.twitter.com/y6AtTvAVU7
— DD News (@DDNewslive) July 11, 2024माजी अग्निवीरांच्या भरतीची सर्व तयारी
सीआरपीएफचे महासंचालक अनिश दयाल सिंह यांनी सांगितले की, सीआरपीएफमध्ये माजी अग्निवीर जवानांची भरती करण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. अग्निवीरांनी सैन्यात असताना शिस्तीबाबत उत्तम प्रशिक्षण घेत नियमनही केले आहे.
"आम्ही घेतलेल्या निर्णयामुळे आमच्याकडे पहिल्या दिवसापासून प्रशिक्षित आणि शिस्तबद्ध कर्मचारी येतील. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला सीआरपीएफमध्ये 5 वर्षांची वयोमर्यादा सवलत दिली जाईल. तर भरती होणाऱ्या माजी अग्निविरांच्या पहिल्या तुकडीला वयात पाच वर्षे सूट दिली जाईल. त्यांना कोणतीही शारीरिक कार्यक्षमता चाचणी द्यावी लागणार नाही.'' असेही दयाल सिंह म्हणाले.
शारीरीक चाचणीची गरज नाही
एसएसबीचे महासंचालक दलजीत सिंग यांनी सांगितले की, 10 टक्के कॉन्स्टेबलच्या जागा माजी अग्निवीरांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. पहिल्या तुकडीला वयाची 5 वर्षे सूट दिली जाईल. त्यांना कोणतीही शारीरिक कार्यक्षमता चाचणी द्यावी लागणार नाही.












Click it and Unblock the Notifications