ऐकावं ते नवलंच..! बेंगळुरुकराने खरेदी केला 50 कोटींचा कुत्रा; काय आहे त्यात खास? वाचा संपूर्ण माहिती

कुत्र्यांचे शौकीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरूच्या इंडियन डॉग ब्रीडर्स असोसिएशनचे अध्यक्ष एस. सतीश यांनी एक महागडा कुत्रा खरेदी केला आहे. कॅडाबॉम्ब ओकामी नावाच्या हा लांडग्यासारखा दिसणारा कुत्रा एस. सतीश यांनी तब्बल ५.७ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ५० कोटी रुपयांना खरेदी केला. हा अनोखा कुत्रा लांडगा आणि कॉकेशियन शेफर्ड यांच्यातील क्रॉस आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच कुत्रा असल्याचे सांगितले जात आहे.

A dog worth 50 crores

कसा आहे कुत्रा?

एस सतीश यांच्याकडे तब्बल १५० हून अधिक वेगवेगळ्या जातीचे कुत्रे आहेत. मी हे पिल्लू खरेदी करण्यासाठी ५० दशलक्ष रुपये खर्च केले. कारण मला कुत्रे खूप आवडतात आणि मला वेगळे कुत्रे बाळगायला आणि त्यांना भारतात आणायला आवडते," असे सतीश यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. अमेरिकेत जन्मलेला कॅडाबॉम्स ओकामी फक्त आठ महिन्यांचा आहे. त्याचे वजन ५ किलोग्रॅमपेक्षा जास्त आहे. तो दररोज ३ किलो कच्चे मांस खातो. ओकामी हा संरक्षक जातीचा कुत्रा असून तो बुद्धीमान म्हणून ओळखला जातो.

कुत्र्यांसाठी आहे स्वतंत्र खोली

सतीश यांच्याकडे एक दुर्मिळ चाऊ चाऊ देखील आहे. जो त्यांनी गेल्या वर्षी सुमारे $3.25 दशलक्ष डाॅलरला खरेदी केला होता. या सर्व कुत्र्यांची चांगली काळजी घेतली जाते. ते सात एकरच्या शेतात राहतात जिथे प्रत्येकाच्या कुत्र्यासाठी २० फूट बाय २० फूट खोली आहे. सतीश म्हणाले की, "त्यांच्याकडे सात एकरचा बंगला आहे. त्यामुळे कुत्र्यांना चालण्यासाठी आणि धावण्यासाठी पुरेशी जागा आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी सहा लोक आहेत. शहरातील हवामान थंड असल्याने त्यांना एअर कंडिशनरची आवश्यकता नाही. परंतु त्यांची चांगली काळजी घेतली जाते," असे त्यांनी सांगितले.

कुत्र्‍यांमुळे मिळाली लोकप्रियता

सतीश यांना यांनी गेल्या महिन्यांत हे पॉश पिल्लू विकत घेतले. वेगवेगळ्या जातीच्या या महागड्या कुत्र्यांमधून सतीश हे पैसे कमवत असल्याचे सांगितले जाते. या कुत्र्‍यांच्या प्रदर्शनातून ते ३० मिनिटांसाठी २,८०० डॉलर्स ते पाच तासांसाठी ११,७०० डॉलर्सपर्यंत कमवतात, असेही काही मिडिया हाऊसच्या बातम्यांमध्ये सांगितले आहे. "मी या कुत्र्यांवर पैसे खर्च केले कारण ते दुर्मिळ आहेत. शिवाय, मला पुरेसे पैसे मिळतात कारण लोक नेहमीच त्यांना पाहण्यास उत्सुक असतात," असेही सतीश यांनी सांगितले. ते म्हणाले की, "या कुत्र्‍यांच्या प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद मिळतो. या कुत्र्‍यांमुळेच मला एकद्या अभिनेत्यापेक्षा जास्त लोकप्रियता मिळते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+