काय ही दादागिरी! बंगळुरुमध्ये तलवारी फिरवत बाईकस्वारांचा स्टंट, व्हिडिओ व्हायरल

Bengaluru Crime News : बंगळुरूमध्ये दुचाकीवर तलवारी फिरवत बाईकस्वारांचा स्टंट एका व्हायरल व्हिडिओतून समोर आला आहे. या बाईकस्वारांना ना कायद्याचे ना पोलिसांचे भय दिसून आले. या व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांनी तलवारी पकडत पाच जणांवर कारवाई केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, नईम, अराफत, साहिल, नंजमत आणि अदनान अशी संशयित आरोपींची नावे आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये असलेला दुचाकीवरील या तरुणावर हयगईने बाईकवर स्टंट करुन दहशत पसरवल्याप्रकरणी या संशयितांना अटक करण्यात आली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Bengaluru Crime News

पोलिसांकडून तत्काळ कारवाई

ज्यावेळी हे बाईकस्वार स्टंट करुन तलवारी फिरवत होते, त्याचा व्हिडिओ एका जागरुक नागरिकाने काढल्याची माहिती आहे. दरम्यान, हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर, बंगळुरू शहर पोलिसांनी संबंधित व्यक्तींना पकडण्यासाठी त्वरीत कारवाई केली. या स्टंटबाजी आणि दहशत निर्माण करण्याच्या प्रकारावर राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

भाजपकडून गृहमंत्र्यांवर टीकास्त्र

बाईकस्वारांचा स्टंट आणि तलवारी फिरवल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच भाजपने कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वरा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजपने "मोहब्बत की दुकान" (शॉप ऑफ लव्ह) या मोहिमेचा उपहासात्मकपणे उल्लेख केला आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लक्ष्य केले आहे.
"बालक बुद्धी @RahulGandhi यांचे विशेष आभार आम्हांला हे 'मोहब्बत की दुकान' भेट दिल्याबद्दल - जिथे तुष्टीकरण ही एकमेव गोष्ट आहे! हे असेच चालू राहिले तर आम्ही गप्प बसणार नाही!" अशी टीका पोस्टद्वारे भाजपकडून करण्यात आली आहे.

संशयितावर गुन्हा दाखल

डेक्कन हेराल्डच्या वृत्तानुसार अटक करण्यात आलेले हे तलवारी हातात घेऊन सोशल मीडियासाठी रील रेकॉर्ड करत असल्याचे तपासात समोर आले आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+