Kumbh Mela 2025 : 'या' सुंदर एअर होस्टेसला का बनायचेय साध्वी? वाचा, तिला संतांनी दिलेला सल्ला
दिव्यता आणि भव्यतेव्यतिरिक्त प्रयागराजमध्ये सुरू असलेला महाकुंभमेळा भाविकांच्या संख्येने देखील चर्चेत आला आहे. नुकतीच महाकुंभ दरम्यान सुंदर साध्वी म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या हर्षा रिचारियानंतर आता आणखी एक सुंदरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महाकुंभ 2025 मधील हा एअर होस्टेसचा व्हिडिओ खूप चर्चेत आला आहे. या व्हि़डीओत या सुंदरीने भगवे कपडे आणि रुद्राक्षाची माळ घातलेली दिसत आहे. दीजा शर्मा नावाच्या या मुलीने अध्यात्म अंगीकारून साध्वी बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

सुंदर व्यक्तींमुळे महाकुंभ चर्चेत
प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याचे अनेक व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. यामध्ये आयआयटी बाबा अभय सिंग आणि हर्षा रिचारिया यांच्या व्हिडिओं होते. आता दिजा शर्माचा व्हिडिओ लोकांची आवड वाढवणारा व्हिडिओ आहे. तिने गळ्यात रुद्राक्षाचे अनेक मणी आणि कपाळावर चंदन लावलेले दिसते.
कोण आहे दिजा शर्मा?
दीजा शर्मा स्पाइस जेटसाठी एअर होस्टेस म्हणून काम करत होती. त्यांनी सांगितले की सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या आईचे निधन झाले, ज्यामुळे त्यांना आध्यात्मिक मार्ग स्वीकारण्याची प्रेरणा मिळाली. या वैयक्तिक नुकसानामुळे त्यांनी आपल्या जीवनाच्या दिशेचा पुनर्विचार केला आणि अध्यात्माकडे वाटचाल केली. साध्वी बनण्याची तिची इच्छा असूनही, संत- महंतांनी तिचे मत परिवर्तने केले. जेव्हा तिने तिचे गुरु आणि गुरुमाता यांच्याकडे साध्वी बनण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यांनी तिला लहान वयामुळे तसे न करण्याचा सल्ला दिला.
दिजाबद्दल लोक काय म्हणाले?
दिजा शर्मा महाकुंभात कुठेही गेली तरी तिच्याभोवती गर्दी जमते. तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी लोक उत्सुक असतात. यूट्यूब चॅनलवर त्याची मुलाखतही व्हायरल झाली असून, त्यात त्याने हर्षा रिचारियावर भाष्य केले आहे. दिजा म्हणाली की, तिला हर्षासारखे व्हायचे नाही आणि तिला तसे दिसायचेही नाही. हर्षा रिचारिया या पूर्वी तिच्या लूकसाठी व्हायरल झाली होती.
दिजाची सोशल मीडियावर चर्चा
दिजाच्या व्हिडिओवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. इंस्टाग्राम फॉलोअर्स वाढवण्यासाठी दिजा हे सर्व करत आहे, असंही काहींच म्हणणं आहे. तिच्याबाबत अनेकांची भिन्न मते असूनही, दिजाचा प्रवास अनेकांना आकर्षित करताना दिसत आहे.












Click it and Unblock the Notifications