बाबा रामदेव यांची आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये एंट्री ! खाण्यासाठी तयार उत्पादने निर्यात करणार
Baba Ramdev : योगगुरू बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली फूड्सने रेडी टू इट फूड प्रोडक्ट्समध्ये दमदार एंट्री केली आहे. अशा उत्पादनांच्या निर्यातीसाठी कंपनीने फार्म टू फ्रीज ही नवीन कंपनी स्थापन केली आहे. कंपनीने आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रेडी-टू-ईट फूड प्रॉडक्ट्स लाँच केले आहेत. बाबा रामदेव यांनी ग्रेटर नोएडा येथे आयोजित कार्यक्रमात ही घोषणा केली आहे.
महाकुंभ 2025 मुळे उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहर सध्या जगभरात चर्चेत आहे. 13 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या महाकुंभाची तयारी जोरात सुरू आहे. प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू होण्यापूर्वी योगगुरू बाबा रामदेव यांनी बुधवारी मोठी घोषणा केली आहे. बाबा रामदेव म्हणाले की, प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू होण्यापूर्वी आम्ही 'आहार कुंभ' सुरू करणार आहोत.

योगगुरू बाबादेव यांनी इंडस फूड 2025 च्या उद्घाटनप्रसंगी म्हणाले की, प्रयागराजमध्ये सुरू होणाऱ्या महाकुंभपूर्वी आम्ही येथे आहारचा कुंभ सुरू करत आहोत. भारताचे खाद्य, भारताचे विचार, भारताची संस्कृती यातील विविधता आम्ही देत आहोत. ज्याला जगभरात पसंती मिळत आहे.
रामदेव बाबा यांनी केली मोठी घोषणा
योगगुरु बाबा रामदेव यांनी म्हणाले की, पतंजलीने 'फार्म टू फ्रीज' नावाची नवीन कंपनी स्थापन केली आहे. ज्याचा आज शुभारंभ होत आहे. बाबा रामदेव म्हणाले ही नवी कंपनी निर्यातीसाठी तयार करण्यात आली असून त्यात सर्व रेडी टू इट प्रॉडक्ट्स ठेवण्यात आले आहेत. हंगेरियन ब्रँडच्या आधी आम्ही त्याची निर्यात करू, असा दावा त्यांनी केला. यामध्ये सर्व खाद्यपदार्थांची निर्यात केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.
#WATCH | Greater Noida, UP | On the inauguration of Indus Food 2025, Yog Guru Baba Ramdev says, "Before the Mahakumbh of Prayagraj, it is the 'diet Kumbh'. We are giving the diversity of India's thoughts, diet and culture and it is being liked all over the world...We have made a… pic.twitter.com/wUaSPpXtpz
— ANI (@ANI) January 8, 2025
बाबा रामदेव यांनी सांगितले की, आता आमची कंपनी परदेशात निर्यातीसाठी लाँच केले जात आहे. त्यानंतर ते भारतात लाँच केले जाईल, असं त्यांनी सांगितले. ही नवीन कंपनी रेडी टू इट आणि फळे परदेशात निर्यात करेल, ती पूर्णपणे चांगल्या दर्जाचे आणि चवदार असतील.












Click it and Unblock the Notifications