55 घाट, 28 लाख दिवे, 1600 अर्चकांनी केली सरयूची पूजा; अयोध्या नगरी उजळली, पाहा- फोटो अन् VIDEO
Ayodhya Dipotsav 2024 : दिवाळीच्या एक दिवस आधी अयोध्यानगरी दिव्यांनी उजळून निघाली आहे. सरयू नदीच्या 55 घाटांवर 28 लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले. यासह एक नवा विक्रम या ठिकाणी स्थापन झाला. गेल्या वर्षी 22 लाख दिवे लावण्यात आले होते.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिरात पहिपला दीप प्रज्वलीत करुनल दीपोत्सवाचे उद्घाटन केले. तर 1600 अर्चकांनी सरयू आरती केली. तत्पूर्वी सीता आणि लक्ष्मण यांच्यासह प्रभू राम पुष्पक विमानाने आले.

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर पहिलाच दीपोत्सव
योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत करुन पूजन केले. देव रथावर आरूढ झाले. योगींनी रामाचा रथ ओढला. प्रभू राम यांना रामकथा उद्यानात आणण्यात आले. येथे योगींनी रामाची आरती केली आणि राजतिलक केले.
#WATCH अयोध्या: दीपोत्सव-2024 समारोह से पहले उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने अयोध्या में भगवान श्री राम का राज्याभिषेक किया। pic.twitter.com/IQWsmJgYsv
— ANI_HindiNews (@AHindinews) October 30, 2024
प्रभू रामाचे स्वागत करण्यासाठी अयोध्येत जोरदार आनंदोत्सव साजरा झाला होता. रामायणातील घटनांवर आधारित शोभायात्रा रस्त्यावर काढण्यात आली. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतरचा हा पहिलाच दिपोत्सव आहे.
#WATCH अयोध्या: दीपोत्सव-2024 समारोह से पहले उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने अयोध्या में भगवान श्री राम का राज्याभिषेक किया। pic.twitter.com/IQWsmJgYsv
— ANI_HindiNews (@AHindinews) October 30, 2024
ही सनातन धर्माची श्रद्धा
मुख्यमंत्री योगी म्हणाले- तुमच्याकडून प्रज्वलित होणारे हे दिवे केवळ दिवे नाहीत, ही सनातन धर्माची श्रद्धा आहे. अयोध्येतील जनतेला पुढे यावे लागेल. मथुरा-काशी अयोध्येसारखी दिसावी. सनातन धर्माने कधीही कोणाचे नुकसान केले नाही, सर्वांना सामावून घेतले. जो कोणी मानवतेच्या मार्गात अडथळा निर्माण करेल त्याला यूपीच्या माफियांप्रमाणेच दुर्गतीला सामोरे जावे लागेल.
पाहा कार्यक्रमाचे फोटो...!
















Click it and Unblock the Notifications