Axis My Indiaचा एक्झिट पोल : दिल्लीत भाजप की 'आप'चे सरकार, जातनिहाय सर्वाधिक मतदान कोणाला?
Delhi Exit Poll Result by Axis My India : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल कालपासून जाहीर होण्यास सुरूवात झालेली आहे. बुधवारी झालेल्या विविध एजन्सीच्या एक्झिट पोलमध्ये दिल्लीत सुमारे 27 वर्षानंतर भाजपची सत्ता येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. अशातच, आज गुरुवारी दि.6 अॅक्सिस माय इंडियाच्या वतीने देखील एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आहे. यात भाजपला 45-55 जागेंवर विजय मिळण्याची शक्यता वर्तविली आहे. तर सद्यस्थितीत सत्तेवर असलेल्या आप (AAP) 15-25 जागांवरच विजय मिळण्याची शक्यता वर्तविली आहे.
अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पक्षाला विजय मिळण्याची शक्यता आहे. तर अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे. हे भाकीत अन्य अनेक पोलशी समन्यय साधणारे आहे.
कोणत्या पक्षाला किती टक्के मतदान होईल?
अॅक्सिस माय इंडियानुसार, भाजप 48 टक्के मतांसह 45-55 जागा जिंकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आप 15-25 जागांसह आणि 42 टक्के मतांसह पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, काँग्रेसला 7 टक्के मतांसह 0-1 जागा मिळण्याची शक्यता आहे.

वयोमानानुसार मतदारांकडून कोणत्या पक्षाला किती पाठिंबा?
एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, भाजपला ज्येष्ठ नागरिकांकडून (61 आणि त्यावरील) सर्वाधिक 52 टक्के पाठिंबा मिळाला आहे, तर 26-35 वयोगटात 'आप'ला सर्वाधिक (47 टक्के) पाठिंबा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
जातनिहाय कोणत्या पक्षाला किती टक्के मिळेल मतदान?
जातीनिहाय आकडेवारीवरून असे दिसून येते की ब्राह्मण (66%), राजपूत (61%), जाट (63%) आणि ओबीसी (58%) भाजपला प्रचंड पाठिंबा देत आहेत, तर 'आप'ला 74 टक्के मुस्लिम मते आणि बहुसंख्य वाल्मिकी (53%), जाट (60%), अनुसूचित जाती (51%) आणि शीख (69%) मते मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तथापि, एक्झिट पोल हे फक्त अंदाज आहेत आणि मतदारांची अचूक निवड दर्शवत नाहीत. अंतिम निकाल भारतीय निवडणूक आयोग शनिवारी, 8 फेब्रुवारी रोजी जाहीर करेल.












Click it and Unblock the Notifications