Shubhanshu Shuklaची अंतराळात झेप अन् पाठविला पहिला संदेश; म्हणाले- माझा तिरंगा माझ्या खांद्यावर,जय..
Shubhanshu Shukla Axiom-4 Marathi News : अभिनंदन..अभिनंदन..भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे मनपूर्वक अभिनंदन, अशा शुभेच्छांचा वर्षाव सद्या भारतासह जगभरात केला जात आहे.
कारण, भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी 'अॅक्सिओम-4' मोहिमेसाठी केनेडी स्पेस सेंटरमधून इतर तीन अंतराळवीरांसह उड्डाण केले आहे. हे अभियान भारताचे शुभांशू शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली आहे.
दुसरीकडे, त्यांनी अंतराळात पोहोचताच देशासाठी पहिला संदेश पाठवला. शुभांशू म्हणाले की, 'माझ्या खांद्यावर माझा तिरंगा आहे. संपूर्ण देश माझ्यासोबत आहे. तसेच अंतराळ मोहिमेवर जाण्यापूर्वी त्यांनी सर्वांचे आभार देखील मानले आहे.

कुठून प्रारंभ झाला मोहीमेला?
अमेरिकेतील फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरपासून सुरू झालेल्या मोहिमेत 'क्रू कंपनीचे फाल्कन 9 रॉकेट' वापरले जात आहे.
सर्व अंतराळवीर नवीन स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानात आहेत. अवकाशात पोहोचल्यानंतर शुभांशू यांनी देशवासियांसाठी पहिला संदेश पाठवला आहे.
Falcon 9’s first stage booster has landed at Landing Zone 1. pic.twitter.com/lRLuJ6RkZy
— Shubhanshu Shukla (@IndiaInSky) June 25, 2025
शुभांशू शुक्लांनी अंतराळातून काय पाठवला संदेश!
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला म्हणाले, "नमस्कार, माझ्या प्रिय देशवासीयांनो! आपण 41 वर्षांनी पुन्हा अवकाशात पोहोचलो आहोत. हा एक अद्भुत प्रवास आहे. आपण पृथ्वीभोवती 7.5 किलोमीटर प्रति सेकंद वेगाने प्रदक्षिणा घालत आहोत. 'माझ्या खांद्यावरील माझा तिरंगा मला सांगतो की मी तुम्हा सर्वांसोबत आहे.
माझा हा प्रवास आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची (ISS) सुरुवात नाही, तर ही भारताच्या मानवी अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात आहे. तुम्ही सर्वांनी या प्रवासाचा भाग व्हावे अशी माझी इच्छा आहे. तुमची छातीही अभिमानाने फुलली पाहिजे. चला आपण सर्व मिळून भारताचा मानवी अंतराळ कार्यक्रम सुरू करूया. जय हिंद! जय भारत!"
कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण!
अॅक्सिओम-४ मोहिमेवर गेलेल्या अंतराळवीर शुभांशू शुक्लाच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. कुटुंबाने त्यांच्या मुलाच्या कामगिरीचा अभिमान असल्याचे सांगितले. शुभांशूच्या संपूर्ण कुटुंबाने आनंद व्यक्त केला आहे. कुटुंबाने म्हटले आहे की त्याच्यामुळे आज आमची छाती अभिमानाने फुलली आहे.
भारताने रचला इतिहास
भारताने अंतराळात मोठी झेप घेतली आहे. भारतीय हवाई दलाचे पायलट ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथील लाँच कॉम्प्लेक्स 39ए येथून स्पेसएक्स क्रू ड्रॅगन अंतराळयानातून फाल्कन 9 रॉकेटमधून अंतराळात उड्डाण केले आहे, हे त्याच लाँचपॅडवरून आहे, जिथून 1969 मध्ये नील आर्मस्ट्राँग अपोलो 11 वर चंद्रावर गेले होते.
मुख्यमंत्री योगी म्हणाले- 'पवनपूत्र'
विशेष बाब म्हणजे, ज्या दिवशी शुभांशू शुक्ला यांचे नाव या मोहिमेसाठी निश्चित करण्यात आले, त्या दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांना 'पवनपुत्र' असे संबोधून खास पद्धतीने अभिनंदन केले.
त्यांनी X वर लिहिले की "भगवान श्री रामाच्या भूमीपासून अंतराळापर्यंत!". पवनपुत्राच्या यशाने संपूर्ण राज्य खूप आनंदी आहे, असे म्हणत त्यांनी सूधांशू शुक्ला यांचे अभिनंदन केले.












Click it and Unblock the Notifications