मोठी बातमी ! आतिशी यांचा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; आपच्या 'या' चार मंत्र्यांनी राखली आब
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी आज नायब राज्यपाल व्हि. के. यांची भेट घेत त्यांच्याकडे राजीनामा दिला. नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. त्यात आम आदमी पक्षाचा पराभव झाला. आज आतिशी मार्लेना दिल्लीच्या राजभवनात पोहोतल्या. त्यांनी एलजींकडे राजीनामा सुपूर्त केला.

गेल्यावर्षी झाल्या मुख्यमंत्री
अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर गेल्या वर्षी २१ सप्टेंबरला आतिशी मार्लेना यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. आतिशी या केवळ साडेचार महिने दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. आतिशी गेल्यावर्षी दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या होत्या. त्याआधी १५ वर्षे दिल्लीवर भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज व दिवंगत काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांनी राज्य केले. या दोन्ही महिला दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या.
Delhi Chief Minister Atishi hands over her resignation to Lt Governor V K Saxena, day after AAP's defeat in assembly polls: Officials
— Press Trust of India (@PTI_News) February 9, 2025
भाजपचा दारूण पराभव
काल शनिवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यात भाजपने ४८ जागा जिंकत बहुमत मिळवले. आम आदमी पक्षाला फक्त २२ जागा जिंकता आल्या. काँग्रेसला दिल्ली विधानसभेत सलग तिसऱ्यांदा खातेही उघडता आले नाही. भाजपने अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदीया यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांचा पराभव केला. आपच्या मंत्रीमंडळातील गोपाल राय, मुकेश अहलावत, इम्रान हुसेन हे तीन मंत्री आपले गड राखू शकले. आतिशी यांनीही कालकाजी मतदारसंघातून ३५२१ मतांनी विजय मिळवला.












Click it and Unblock the Notifications