Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आसाममध्ये गोमांस विक्रीवर बंदी, उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा CM हेमंत सरमा यांचा इशारा

Assam Beef Ban Update: आसाम सरकारने गोमांसावर बंदी घातली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुरुवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली. आसाम सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणी गोमांस दिले जाणार नाही. असे मुख्यमंत्री सरमा यांनी सांगितले.

दरम्यान, या निर्णयानंतर कॉंग्रेसकडून टीका केली जात असून आसाम सरकारमधील मंत्र्यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, कॉंग्रेसने या निर्णयाचे स्वागत करावे अन्यथा त्यांनी पाकिस्तानात जाऊन राहावे, असा हल्लाबोल सरमा यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी दिला.

Assam Beef Ban Update

कॉंग्रेसने लिखित स्वरुपात द्यावे, आम्ही कारवाई करू- हिंमता सरमा

समगुरी जागेवरील पोटनिवडणुकीसाठी 13 नोव्हेंबरला मतदान झाले होते. 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर खासदार रकीबुल हुसैन यांनी काँग्रेसच्या पराभवावर भाजपवर गोमांस वाटल्याचा आरोप केला होता. प्रत्युत्तरात मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी भाजपच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितले की होते की, काँग्रेसने लिखित स्वरूपात दिले तर ते राज्यात गोमांस बंदी करण्यास तयार आहेत.

गोमांस देऊन समगुरीची जागा जिंकता येईल का?

सरमा म्हणाले होते, मला हे जाणून घ्यायचे आहे की काँग्रेस मतदारांना वेठीस धरून निवडणूक जिंकत आहे का. ते समगुरीला चांगलेच ओळखतात. याचा अर्थ गोमांस देऊन समगुरी जिंकता येते का? यावर्षी धुबरी लोकसभा मतदारसंघातून 10.12 लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी होऊन हुसेन खासदार झाले आहेत. याआधी ते सलग पाचवेळा समगुरीचे आमदार होते.

सरमा म्हणाले, मी रकीबुल हुसैन यांना सांगू इच्छितो की गोमांसावर बंदी घातली पाहिजे कारण त्यांनी स्वतःच ते चुकीचे असल्याचे म्हटले आहे. ते फक्त मला लिखित स्वरूपात देणे आवश्यक आहे. भाजप आणि काँग्रेसने गोमांसावर बोलू नये. भाजप, एजीपी, सीपीएम काहीही देऊ शकणार नाहीत आणि हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन सर्वांनी गोमांस खाणे बंद केले पाहिजे.

आसाम कॅटल प्रिझर्वेशन ऍक्ट काय आहे?

आसाममध्ये गोमांस खाणे बेकायदेशीर नाही, परंतु आसाम कॅटल प्रिझर्व्हेशन ऍक्ट 2021 नुसार ज्या भागात हिंदू, जैन आणि शीख बहुसंख्य आहेत आणि कोणत्याही मंदिर किंवा सत्राच्या (वैष्णव मठ) परिसरात गोवंश हत्या आणि गोमांस विक्रीवर बंदी आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+