Ashadha 2025 : आषाढ महिन्यात कोणते उपवास अन् सण आहे? एकादशी, गुरुपौर्णिमेची तारीख काय? घ्या जाणून
Ashadha month 2025 fasts and festivals list in marathi : आषाढ महिना लागला की, वेध लागतात ते लाडक्या विठुरायाला भेटण्याचे कारण या महिन्यात महाराष्ट्रातून लाखो भाविक पंढरपूरला लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी त्याच्या दर्शनासाठी पायी वारी करतात. हजारो दिंड्या आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये येतात.
हे आषाढी एकादशीची महती झाली तरीही या महिन्यात आणखी मराठी सण आणि उपवास आहेत. मराठी वर्षातील आषाढ महिना हा चौथा महिना आहे. आषाढ महिना देवी दुर्गाला समर्पित आहे आणि या महिन्यात देवीची पूजा केली जाते. या महिन्यात आपल्या गुरूची पूजा करण्याचेही विशेष महत्त्व आहे.

आषाढ महिन्याचे धार्मिक, आध्यात्मिक महत्त्व खूप जास्त आहे. या महिन्यात देवीची पूजा केल्याने सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते अशी भक्तांची भावना असते. या महिन्यात गुप्त नवरात्रीसोबतच गुरु पौर्णिमा देखील येते आणि अनेक ग्रह देखील त्यांच्या राशी बदलतील. आज आपण आषाढ महिन्यातील महत्वाचे सण, उत्सव आणि उपवास जाणून घेणार आहोत.
आषाढ महिन्यातील प्रमुख उपवास आणि सणांची यादी (Ashadha month 2025)
- 14 जून : संकट चतुर्थी उपवास
- 21 जून: योगिनी एकादशी व्रत
- 23 जून: सोम प्रदोष
- 2 जून: गुळ प्रदोष व्रत
- 26 जून नवरात्रीची सुरुवात
- 27 जून : जगन्नाथ रथयात्रा
- 28 जून : विनायक चतुर्थी व्रत
- 30 जून : कुमार स्कंद षष्ठी
- 1 जुलै : विवस्वत सप्तमी
- 3 जुलै : दुर्गाष्टमी
- 4 जुलै : भाद्राली नवमी , गुप्त नवरात्रीची समाप्ती
- 6 जुलै : देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी, चातुर्मास प्रारंभ
- 8 जुलै : भौम प्रदोष व्रत
- 10 जुलै : गुरु पौर्णिमा
आषाढ महिन्यात बदलणारे ग्रह ((Ashadha Month 2025)
- 15 जून: सकाळी 6:43 वाजता मिथुन राशीत सूर्य
- 29 जून: दुपारी 2:09 वाजता वृषभ राशीत शुक्र
- 8 जुलै: सकाळी 6:48 वाजता पूर्वेला गुरु उदय
सूर्य आर्द्रामध्ये प्रवेश करेल, चांगला पाऊस पडेल
22 जून रोजी आषाढ महिन्यात सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करेल. हे पाण्याचे प्रमुख नक्षत्र आहे. त्यामुळे, या नक्षत्रात सूर्याच्या आगमनाने, चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. 22 जूनपासून संपूर्ण देशात जोरदार वारे आणि वादळासह मुसळधार पाऊस पडेल. देशाच्या उत्तरेकडील आणि डोंगराळ राज्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
गुप्त नवरात्र
आषाढ महिन्यात येणाऱ्या नवरात्राला गुप्त नवरात्र म्हणतात. तांत्रिकांमध्ये या नवरात्राचे खूप महत्त्व आहे. यावेळी शेकडो विद्वान कामाख्या देवी मंदिरात जमतात आणि त्यांच्या साधना सिद्धी साध्य करतात.












Click it and Unblock the Notifications