'पुष्पा-२' मधल्या 'सामी'वर अरविंद केजरीवाल यांचा तुफान डान्स; काय होते निमित्त? Watch Video
आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या मुलीचा साखरपुडा समारेंभ गुरुवारी रात्री दिल्लीतील एका हाॅटेलमध्ये पार पडला. या कार्यक्रमात अरविंद केजरीवाल व त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी लोकप्रिय 'पुष्पा-२' चित्रपटातील अंगारो का अंबर सा... या गाण्यावर दिलखेचक डान्स केला. या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

राजकारणीही झाले सहभागी
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरणाऱ्या आणखी एका व्हिडिओमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे या सोहळ्यात सहभागी असल्याचे दिसून आले आहे. मान हे साखरपुड्याच्या समारंभात भांगडा वाजवताना दिसले. सार्वजनिक व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्याची दुर्मिळ झलक दाखवत या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले.
काय करते हर्षिता केजरीवाल?
अरविंद केजरीवाल यांची मोठी मुलगी हर्षिता केजरीवाल यांनी १८ एप्रिल रोजी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये तिचा कॉलेज मित्र संभव जैनसोबत लग्न केले. हे नवविवाहित जोडपे व्यावसायिक भागीदार देखील आहेत. त्यांनी बेसिल हेल्थ नावाच्या आरोग्यसेवा स्टार्टअपची सह-स्थापना केली आहे. अरविंद केजरीवाल आणि सुनीता केजरीवाल यांची मोठी मुलगी हर्षिता हिने २०१८ मध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर गुरुग्राममधील बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप (बीसीजी) मधून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिचा धाकटा भाऊ पुलकित सध्या आयआयटी दिल्लीमध्ये शिक्षण घेत आहे.
VIDEO | Visuals of Arvind Kejriwal (@ArvindKejriwal), AAP convenor and former Delhi CM, dancing with his wife, Sunita Kejriwal, at their daughter's engagement ceremony in Delhi on Thursday.
— Press Trust of India (@PTI_News) April 18, 2025
(Source: Third party)
(Full video on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/oBWXYiExMg
केजरीवाल दांम्पत्याचा डान्स
दिल्लीत झालेल्या त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याच्या समारंभात आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्यासोबत लोकप्रिय 'पुष्पा २: द रुल' गाणे 'अंगारो का अंबर सा' वर थिरकताना दिसले. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीचा साखरपुडा समारंभ गुरुवारी रात्री शांग्री-ला हॉटेलमध्ये एका खाजगी कार्यक्रमात पार पडला, ज्यामध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान देखील उपस्थित होते. पीटीआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या या सोहळ्याच्या व्हिडिओमध्ये हे जोडपे 'पुष्पा २: द रुल' या चित्रपटातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांनी सादर केलेल्या लोकप्रिय गाण्यावर नाचताना दिसत आहे.












Click it and Unblock the Notifications