संगीतकार एआर रहमान यांचा संसार तुटला; पत्नी सायरा यांनी केली विभक्त होण्याची घोषणा
संगीतविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ संगीतकार एआर रहमान यांचा संसार तुटला आहे. त्यांच्या पत्नी सायरा रहमान यांनी पतीपासून विभक्त होत असल्याची घोषणा केली आहे.

सायरा यांच्या वकील वंदना शाह यांनी या दाम्पत्याच्या विभक्त होण्याच्या निर्णयाबाबत अधिकृत निवेदन जारी केले.
काय म्हटले निवेदनात?
वकील वंदना शाह यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, कित्येक वर्षाच्या संसाराला आम्ही आता थांबवत आहोत. पती ए.आर. रहमान यांच्यापासून वेगळे होण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांच्या नात्यातील महत्त्वपूर्ण भावनिक तणावाचा काळ आहे.
एकमेकांवर त्यांचे नितांत प्रेम असूनही, या जोडप्याला असे आढळून आले आहे की तणाव आणि अडचणींमुळे त्यांच्यात एक दरी निर्माण झालेली आहे. जी यावेळी कोणत्याही परिस्थितीत भरून काढता येणार नाही.
निवेदना पुढे म्हटले आहे की, सायरा यांनी वेदना आणि त्यापासून अलिप्त राहण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. सायरा या आव्हानात्मक काळात लोकांकडून गोपनीयतेची आणि समजूतदारपणाची विनंती करतात. ही आव्हानात्मक वेळ, कारण ती तिच्या आयुष्यातील हा कठीण काळात मार्गक्रमण करत आहे, असे म्हटले आहे.
रहमान यांचे कधी झाले लग्न?
ख्यातनाम संगीतकार एआर रहमान यांचे 1995 मध्ये लग्न झाले होते. त्यांना तीन पाल्य आहेत. त्यांचे नाव खतिजा, रहीमा आणि आमीन अशी आहेत.एआर रहमान यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर रहमानचा यांचा शेवटचा प्रोजेक्ट धनुषचा दुसरा दिग्दर्शकीय उपक्रम, रयन यामध्ये त्यांनी संगीत दिले. तर आगामी छावा, ठग लाइफ, गांधी टॉक्स आणि इतर चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. तर काही चित्रपटांच्या संगीतावर त्यांचे काम चालू आहे.












Click it and Unblock the Notifications