'दिल्ली मेट्रोमध्ये विद्यार्थ्यांना 50% सूट मिळावी, केजरीवाल यांचं पंतप्रधान मोदींना पत्र
Delhi Assembly election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापले आहे. सर्व पक्ष एकमेकांवर आरोप करत असताना दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक महत्त्वाचे पत्र लिहिलं आहे.
दिल्ली मेट्रोमध्ये विद्यार्थ्यांना 50 टक्के सवलत देण्याची मागणी केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे. या योजनेचा खर्च केंद्र आणि दिल्ली सरकार संयुक्तपणे उचलतील, असे त्यांनी सांगितलं आहे.

अरविंद केजरीवाल यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "महिलांनंतर आता आम्ही विद्यार्थ्यांना बसमध्ये मोफत प्रवासाची घोषणा करणार आहोत. आम्ही केंद्राकडे मेट्रोमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवासाची मागणी आधीच केली होती." केजरीवाल यांनी यावर पत्रकार परिषद घेण्याची घोषणाही केली आहे.
पत्रात काय लिहिले आहे?
केजरीवाल यांनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे की, "दिल्लीतील विद्यार्थी शाळा किंवा महाविद्यालयात जाण्यासाठी मेट्रोवर खूप अवलंबून आहेत. विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी मी दिल्ली मेट्रोमध्ये 50 टक्के सूट देण्याचा प्रस्ताव ठेवतो." हा प्रकल्प दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील 50:50 सहकार्यावर आधारित आहे. त्यामुळे दोन्ही सरकारे समान खर्च उचलतील. मला आशा आहे की तुम्ही या प्रस्तावाला सहमती द्याल."
AAP National Convenor Arvind Kejriwal writes to Prime Minister Narendra Modi to provide a 50% subsidy on Metro fares for school and college students.
— ANI (@ANI) January 17, 2025
He also proposed that the burden of this subsidy be borne by the state and central government by a ratio of 50:50 pic.twitter.com/no13Y8QC2Z
दरम्यान यापूर्वी केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून दिल्लीच्या जाट समुदायाला केंद्राच्या ओबीसी यादीत समाविष्ट करण्याची मागणी केली होती. गेल्या 10 वर्षांपासून केंद्र सरकारने ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली जाट समाजाची फसवणूक केली आहे, असा आरोप त्यांनी केला.
गृहमंत्री अमित शहा यांनी 2019 मध्ये जाट समाजाला ओबीसी यादीत समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु हे आश्वासन पूर्ण झाले नाही. ओबीसी यादीत समाविष्ट नसल्यामुळे जाट समाजातील हजारो मुलांना दिल्ली विद्यापीठात प्रवेश मिळू शकला नाही, असं केजरीवाल म्हणाले होते.












Click it and Unblock the Notifications