Video : अपूर्वा मखिजाने रडत रडत मागितली माफी; म्हणाली माझ्यावर काळी जादू झाली, कुणी केली तर...
इंडियाज गॉट लेटेंट वादानंतर अपूर्वा माखीजा अजूनही चांगलीच चर्चेत आहे. १ एप्रिल २०२५ रोजी तिने इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट डीलिट केल्या. एक आठवड्यानंतर ८ एप्रिलला ती पुन्हा सोशल मीडियावर आली. तेव्हा तिने नेटिझन्सकडून मिळालेल्या बलात्काराच्या धमक्या, तिच्यावर करण्यात आलेली काळी जादू याबाबतचे काही स्किनशाॅट शेअर केले. तिने एक व्हिडीओ प्रसारीत करुन समय रैनाच्या शोमध्ये सामील होण्यापासून ते वादात अडकण्यापर्यंतची कहाणी सांगितली. या व्हिडीओत अपूर्वा रडताना आणि माफी मागतानाही दिसली.

इंडियाज गॉट लेटेंट कसे मिळाले?
अपूर्वा मखीजा म्हणाली की, गेल्या वर्षी एका कार्यक्रमादरम्यान तिची भेट समय रैनाशी झाली. ज्याने इंडियाज गॉट लेटेंटसाठी तिच्याशी संपर्क साधला. दिवाळीसाठी तिच्या कुटुंबासह बाहेर जाण्याच्या तयारीत असतानाच समय रैनाने तिला इंडियाज गॉट टॅलेंटच्या शूटिंगसाठी बोलावले. ती शोचा भाग होण्यासाठी इतकी उत्सुक होती की तिने तिची कौटुंबिक सहल रद्द केली. अपूर्वाने सांगितले की जेव्हा ती शूटिंगसाठी पोहोचली आणि काही वेळाने जेव्हा ती तिच्या ग्रीन रूममध्ये गेली तेव्हा ती तिच्या मॅनेजर आणि मित्रांसमोर रडू लागली आणि म्हणाली की ती शोसाठी योग्य नाही. परंतु नंतर समयने तिला शांत होण्यास सांगितले.
अपूर्वीने मागितली माफी
व्हिडिओमध्ये पुढे तिने चाहत्यांची माफी मागितली. आणि म्हणाली, 'मी खरोखरच लोकांचे मनोरंजन करण्यासाठी आणि त्यांना हसवण्यासाठी कंटेंट तयार करते. मला कधीच कोणाला दुखवायचे नव्हते आणि मला खूप वाईट वाटते की मी माझ्या शब्दांबद्दल अधिक काळजी घ्यायला हवी होती. पण मी धडा शिकले आहे आणि मी वचन देतो की मी पुढे चांगले करेन. मला फक्त आशा आहे की तुम्ही मला माफ कराल आणि जर मी तुमच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते.
आई आजारी पडली
अपूर्वीने पुढे सांगितले की, लोकांनी माझ्या आईचा आयडी शोधला. तिला खूप शिवीगाळ केली. तिला या सगळ्याची सवय नव्हती. तेव्हापासून आईची तब्येत खराब आहे. माझ्या पालकांसोबत वाईट गोष्टी घडत होत्या. दररोज जेव्हा मी जागी होत होते तेव्हा काहीतरी नवीन घडत होते.
काळी जादू करण्यात आली
अपूर्वी पुढे म्हणाली की, ' या सगळ्या प्रकरणानंतर मी माझ्या टॅरो रीडरकडे गेले. त्यांनी मला सांगितले की तुझ्यावर काळी जादू करण्यात आली आहे. माझ्यासोबत जे घडत होते ते सामान्य नव्हते. त्यामुळे माझ्यावर काळी जादू झालीय, यावर माझा विश्वास आहे. टॅरो रिडरने माझ्यावर काळी जादू कुणी केली, ती व्यक्ती कशी दिसते हे सर्व काही सांगितले. त्यानंतर अपूर्वीने रडत-रडत माफी मागितली. ती म्हणाली, 'मी वचन देते की मी भविष्यात चांगलं काम करेल. मला फक्त अशी आशा आहे की, तुम्ही मला क्षमा कराल. जर मी तुमच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून माफी मागते, असेही अपूर्वाने सांगितले.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता! -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं?








Click it and Unblock the Notifications