Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

दिल्ली निवडणुकीत अण्णा हजारेंची एन्ट्री; अण्णांचा 'तो' व्हिडीओ संदेश कुणाला तारणार? कुणाला मारणार?

दिल्ली विधानसभेसाठी येत्या ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून, त्याचा निकाल ८फेब्रुवारीला लागेल. या निवडणुकीत भाजप व आपमध्ये जोरदार लढत पहायला मिळत आहे. सर्वपक्षीयांचा जोरदार प्रचार सुरू आहे. अशातच समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीतील मतदारांना एक सल्ला दिला आहे. कोणत्या उमेदवाराला मत द्यावे आणि कोणाला निवडून देऊ नये, याबाबत त्यांनी भाष्य केले आहे. सध्या अण्णा हजारेंचा हाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Anna Hazare

अण्णा हजारेंचा सल्ला

दिल्लीतील मतदानाआधीच अण्णा हजारे यांचा हा सल्ला समोर आला आहे. हजारे यांनी शनिवारी दिल्लीतील मतदारांना सांगितले की, स्वच्छ विचार आणि उत्तम चारित्र्य असलेल्या व्यक्तिंनाच निवडून द्या. जे देशासाठी बलिदान देतील आणि अपमान सहन करू शकतील, अशाच लोकांना मत देण्याचा सल्ला हजारे यांनी दिला आहे.
आम आदमी पक्ष अस्तित्वात येण्यापूर्वी अरविंद केजरीवाल आणि अण्णा हजारे हे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात एकत्र होते. मात्र, अरविंद केजरीवाल यांनी राजकारणात जाण्यास आणि पक्ष काढण्यास त्यांचा विरोध होता. त्यामुळेच आता त्यांच्या या वक्तव्याला जास्त महत्त्व आले आहे.

अण्णांचा व्हिडीओ व्हायरल

अण्णा हजारे यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत दिल्लीतील मतदारांना हा संदेश दिला आहे. बिनकामाच्या लोकांना मते देऊ नका, तसे कराल तर हा देश नष्ट होईल, अशी भीती देखील त्यांनी या व्हिडीओत व्यक्त केली आहे. या व्हिडीओत अण्णा हजारे सांगतात, दिल्लीत लवकरच निवडणुका होणार आहेत. शुद्ध, देशहिताचे विचार आणि उत्तम चारित्र्य असलेल्या उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन मी मतदारांना करतो. जे उमेदवार सत्याची कास धरत असतील, जे त्याग करत असतील आणि जे अपमान सहन करू शकत असतील, अशाच उमेदवारांना निवडून देण्याचा आवाहनही त्यांनी केले आहे.

आपला देणार झटका?

अण्णा हजारे यांनी दिल्लीत भ्रष्टाचारा विरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर 2012 मध्ये अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या त्यांच्या अनुयायांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली. 2013 मध्ये बहुमत मिळवत हा पक्ष सत्तेत आला. मात्र, केजरीवालांचा राजकारणातील प्रवेश अण्णा हजारे यांना मान्य नव्हता. त्यांनी वेळोवेळी त्याबाबत नापसंती देखील व्यक्त केली आहे. आता ऐन मतदानापूर्वी त्यांचा हा व्हिडीओ आला असल्याने आपला झटका बसण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+