Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

उपमुख्यमंत्री पवन कल्याणच्या मुलाच्या हात- पायांला गंभीर दुखापत, रुग्णालयात दाखल

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धाकटा मुलगा मार्क शंकर सिंगापूरमध्ये अपघाताचा बळी ठरला आहे. सिंगापूरमधील एका शाळेला लागलेल्या आगीत मार्क शंकर जखमी झाला आहे. अपघातात त्याच्या हाताला आणि पायाला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातानंतर त्यांना सिंगापूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही बातमी येताच, पवन कल्याण सिंगापूरला रवाना होत आहे. पवन कल्याण सध्या त्यांच्या राजकीय कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहेत.

पवन कल्याण सध्या आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी त्याचे नियोजित कार्यक्रम पूर्ण करून सिंगापूरला जाण्याचा निर्णय घेतला आहे. पवन कल्याण यांच्या पक्ष जनसेना पक्षाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि माहिती दिली की ते त्यांच्या राजकीय कार्यक्रमांनंतर सिंगापूरला रवाना होतील.

Ap Dcm Pawan Kalyan

एका पोस्टमध्ये पवन कल्याण म्हणाले होते की, "मी काल त्या गावातील आदिवासींना वचन दिले होते की, मी अराकू जवळील कुरिडी गावाला भेट देईन. म्हणून मी त्या गावात जाईन, त्यांच्याशी बोलेन आणि तिथल्या समस्या जाणून घेईन. काही विकास योजना सुरू करायच्या आहेत म्हणून मी दौरा संपल्यानंतरच सिंगापूरला जाईन" असं त्यांनी म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पवन कल्याण आदिवासी भागात दौरा पूर्ण केल्यानंतर विशाखापट्टणमला पोहोचतील. विशाखापट्टणमवरुन त्याच्या मुलाकडे सिंगापूरला जाण्याची व्यवस्था केली जात आहे. मार्क शंकरची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे आणि डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या घटनेची बातमी कळताच पवन कल्याणचे चाहते आणि हितचिंतकही खूप चिंतेत आहेत. सध्या सर्वजण मार्क शंकर यांना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+