मदर डेअरीनंतर अमूलनेही वाढवल्या दुधाच्या किंमती; कारण काय? किती वाढल्या किंमती? वाचा
अमूलने समुहानेही आता दुधाच्या किमती वाढवल्या आहेत. यापूर्वी मदर डेअरीने आपले भाव वाढवले होते. अमुलने बुधवारी दरवाढीची घोषणा केली. ही वाढ उद्यापासून म्हणजेच १ मे २०२५ पासून लागू होईल. अमूलने विविध प्रकारच्या दुधाच्या किमतीत प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली आहे. या दवाढीमागचे कारणही अमुलने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता उद्यापासून सामान्य दुध ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे.

काय आहे कारण?
अमुलची दरवाढ उद्यापासून म्हणजेच १ मे पासून लागू होणार आहे. या वाढीचे कारण उत्पादन खर्चात वाढ असल्याचे म्हटले जात आहे. जनावरांच्या चाऱ्याचा खर्च वाढल्याने ही वाढ करण्यात आल्याचे सांगितले जातेय. दुधाच्या किमती वाढवणारी ही सलग दुसरी मोठी डेअरी कंपनी आहे. यामुळे सामान्य माणसावरचा भार आणखी वाढेल. काल मदर डेअरीनेही किमती वाढवल्या होत्या.
दूध किती रुपयांनी महागले?
मदर डेअरीनंतर अमूलने दुधाचे दर वाढवले आहेत. १ मे २०२५ पासून त्याचे दूध प्रति लिटर २ रुपयांनी महाग होईल. अमूलने बुधवारी ही घोषणा केली. ही वाढ सर्व प्रकारच्या दुधावर लागू असेल. ५०० मिली पॅकवर १ रुपयांची वाढ होईल. अमूल हा भारतातील सर्वात मोठा दुग्धजन्य पदार्थांचा ब्रँड आहे. कंपनीने दुधाच्या किमतीत बदल केल्यानंतर आता ग्राहकांना दुधासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
कोणत्या पॅकचे भाव वाढले?
हा बदल जवळजवळ सर्व प्रकारच्या अमूल दुधात झाला आहे. कंपनीने म्हटले आहे की, 'अमूल स्टँडर्ड, अमूल बफेलो मिल्क, अमूल गोल्ड, अमूल स्लिम अँड ट्रिम, अमूल चाय माझा, अमूल ताजा आणि अमूल गायीच्या दुधाच्या किमतीत २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.' याचा अर्थ असा की आता तुम्हाला अमूलचे दूध खरेदी करण्यासाठी थोडे जास्त पैसे द्यावे लागतील.












Click it and Unblock the Notifications