Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सरकार लवकरच ओला आणि उबर सारख्या टॅक्सी सेवा सुरू करणार, गाडी चालकाला मिळणार थेट नफा

देशात लवकरच ओला-उबेर सारख्या टॅक्सी सेवांच्या धर्तीवर एक सरकारी टॅक्सी प्लॅटफॉर्म सुरू होणार आहे.देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत याबाबत मोठी घोषणा केली आहे. सरकारच्या प्रयत्नांनी लवकरच सहकारी टॅक्सी सेवा सुरू केली जाईल, असे शाह यांनी सांगितले आहे. याअंतर्गत, कार, ऑटो आणि बाईक टॅक्सी चालवणारे लोक नोंदणी करू शकतील. यातून मिळणारा संपूर्ण नफा थेट ड्रायव्हरला जाईल आणि त्याच्याकडून कोणतेही कमिशन घेतले जाणार नाही.

अमित शहा यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी संसदेत ही माहिती दिली. अमित शहा म्हणाले की, आतापर्यंत अशा टॅक्सी सेवांमधून मिळणारे कमिशन श्रीमंत लोकांच्या हातात जायचे आणि ड्रायव्हर बेरोजगार राहायचे. आता हे होणार नाही आणि एक सहकार क्रांती सुरू होईल.

Amit Shah

सरकारकडून सहकारी विमा कंपनीची तयारी...

अमित शहा पुढे बोलताना म्हणाले, 'सहकारातून समृद्धीचा नारा हा केवळ एक नारा नाही तर आम्ही तो प्रत्यक्षात अंमलात आणला आहे. लवकरच आम्ही एक सहकारी विमा कंपनी देखील येणार आहे. खूप कमी वेळात, आम्ही एक सहकारी विमा कंपनी देखील स्थापन करणार आहोत, जी देशभरातील सर्व सहकारी प्रणालींचा विमा उतरवेल. मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की, या कंपनीच्या स्थापनेनंतर ही कंपनी अल्पावधीतच खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी विमा कंपनी बनेल." खरं तर, उबर आणि ओला सारख्या कंपन्यांच्या सहकार्याने टॅक्सी चालवणाऱ्या चालकांना त्यांच्या कमाईचा काही भाग द्यावा लागतो. सबस्क्रिप्शन फी भरावी लागते आणि ड्रायव्हर्सना प्रत्येक राईडवर कंपनीला एक निश्चित कमिशन देखील द्यावे लागते.

...तर भारत हा जगातील पहिला देश बनेल

सहकारी टॅक्सी सेवांच्या आगमनाने, दिल्ली, मुंबई, लखनऊ, पटना, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळुरू सारख्या शहरांमध्ये वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा होऊ शकते. आतापर्यंत लोकांना ओला आणि उबर सारख्या टॅक्सी सेवांवर अवलंबून राहावे लागत होते. सुरुवातीच्या टप्प्यात या टॅक्सी सेवांमुळे चालकांना खूप फायदा झाला, परंतु आता कंपन्यांनी त्यांचे कमिशन वाढवले ​​आहे.

अशा परिस्थितीत टॅक्सी सेवेतून होणाऱ्या नफ्यात चालकांचा वाटा लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. याकडे लक्ष वेधत अमित शहा म्हणाले की, आता टॅक्सी सेवेचा नफा श्रीमंतांकडे जाणार नाही तर त्याचा पूर्ण फायदा चालकांना मिळेल. जर सरकारने प्रस्तावित केलेला हा नवीन सहकारी टॅक्सी प्लॅटफॉर्म सुरू झाला तर. त्यामुळे खाजगी राइड-हेलिंग सेवांना सरकार-समर्थित सहकारी पर्याय प्रदान करणारा भारत जगातील पहिला देश बनेल

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+