अमित शहांसह पंजाबमधील मोठ्या नेत्यांच्या हत्येच्या कटाबद्दल मोठा खुलासा व्हॉट्सअप चॅटमधून माहिती उघड
पंजाबमधील खालिस्तानी समर्थक आणि खादूर साहिबचे खासदार अमृतपाल सिंग यांच्या समर्थकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस खासदार रवनीत सिंग बिट्टू आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम मजीठिया यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
या कटाचा उलगडा व्हॉट्सअॅप ग्रुप "वारिस पंजाब दे टीम" च्या लीक झालेल्या चॅटमधून झाला आहे. पंजाब पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना अटक केली असून, या कटामागील कारण म्हणून अमृतपाल यांच्या राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत एका वर्षाने शिक्षेचा बदला घेण्याचा उद्देश असल्याचे समोर आले आहे.

कटाचा खुलासा आणि चॅटचे तपशील समोर
दरम्यान 21 एप्रिल 2025 रोजी, सोशल मीडियावर "वारिस पंजाब दे टीम" या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या चॅटचे स्क्रीनशॉट्स लीक झाले, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली. या ग्रुपमध्ये 600 हून अधिक सदस्य आहेत आणि त्यांनी अमित शहा, रवनीत बिट्टू, आणि बिक्रम मजीठिया यांच्यावर हल्ल्याची योजना आखली होती. या चॅटमध्ये शास्त्रांचा पुरवठा, परदेशी निधी, आणि हल्ल्यासाठी लागणारे शास्त्र याबाबत चर्चा झाली होती.
या कटामागील मुख्य कारण म्हणून अमृतपाल सिंग यांच्या NSA अंतर्गत झालेल्या शिक्षेच्या मुदतीत एक वर्षाची वाढ (20 एप्रिल 2025 रोजी जाहीर झाली) आहे. अमृतपाल हा सध्या आसामच्या दिब्रूगड जेलमध्ये आहेत आणि त्यांचे समर्थक त्यांच्या अटकेच्या विरोधात आहेत. रवनीत बिट्टू यांना अमृतपालच्या अटकेच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे तर बिक्रम मजीठिया यांनी अमृतपालच्या गटावर टीका करत त्यांचे अनेक ऑडिओ क्लिप्स सार्वजनिक केले आहेत.
पोलिसांची मोठी कारवाई
पंजाब पोलिसांनी या प्रकरणी त्वरित कारवाई करत दोन संशयितांना अटक केली आहे. अटक केलेले संशयित म्हणजे खन्नाचे बलकर सिंग आणि मोग्याचे पवंडीप सिंग आहेत तर तिसरा संशयित लखदीप सिंग सरदारगड (बठिंडा) अजूनही पसार आहे. या प्रकरणी मोग्यातील सायबर क्राइम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलिस करत आहेत.












Click it and Unblock the Notifications