Ambedkar Jayanti 2025 : बाबासाहेबांवर आधारित प्रेरणादायी-संघर्षाने भरलेली शायरी, कविता अन् गाणी!
Babasaheb Ambedkar Jayanti 2025 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजी जयंती आहे. या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम होतात. बाबासाहेबांच्या पुतळयाला अभिवादन केले जाते. बाबासाहेबांच्या जयंती-2025 निमित्त आज आपण त्यांच्यावर आधारित शायरी व त्यांच्यावर आधारित काही गाण्यांविषयी माहिती जाणून घेऊया, जेणेकरून हे वाचून तुम्हालाही ते शेअर करता येतील अन् बाबासाहेबांचा विचार शायरीतून समजावून घेता येईल...!
डॉ. आंबेडकरांचा जन्म कुठे आणि केव्हा झाला?
भीमराव रामजी आंबेडकर अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1891-1956) यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू छावणी येथे झाला.
त्यानंतर त्यांचे वडील महाराष्ट्रात आले अन् त्यामुळे बाबासाहेबांचे शिक्षण ते त्यांचे महान कार्याला महाराष्ट्रात सुरूवात झाली. बाबासाहेबांनी उच्चशिक्षण घेऊन राज्यघटनेची निर्मिती केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित शायरी...!
फुलांची कहाणी वसंताने लिहीली
रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहीला
आम्ही नाही कोणाचे गुलाम
कारण आमच्या आयुष्याची कहाणी
बाबासाहेबांनी लिहीली
जय भीम !
कुराण सांगतं मुसलमान व्हा
बायबल सांगतं ख्रिश्चन व्हा
भगवदगीता सांगतं हिंदू व्हा
पण माझ्या बाबासाहेबांचं
संविधान सांगतं मनुष्य व्हा
जय भीम
हे सारं आयुष्य ज्यांच्या शरणास
आमचं नमन आहे बाबांच्या चरणास
पूजेच्या योग्य आहेत बाबा आमच्या नजरेस
चला मिळून वाहूया फुलं बाबांच्या चरणास
इथे फक्त नावासाठी देव किती झाले..
पण एका भीमामुळे आम्ही आज मानव झालो..
ज्यांना चालणं आणि सांभाळणं लक्षात नव्हतं
आज धुळीतून उभं राहून आकाश झाले
हे भीम बाबा आम्हाला वाचवलंत तुम्ही
या निष्ठूर जगाने आम्हाला टाकलं
पण तुम्ही आम्हाला जवळ केलंत
जय भीम!
सन्मान मला तुमच्या संविधानामुळे मिळाला आहे
हा सन्मानही मला तुझ्या संविधानाने मिळाला आहे
जे इतरांना नशिबाने मिळालं आहे ते नशीब ही
आम्हाला तुमच्या संविधानाने मिळालं आहे
बाबासाहेबांना नमन..!
ना आयुष्याचं सुख ना मृत्यूचं दुःख
जोपर्यंत आहे जोर..तोपर्यंत म्हणू जय भीम
जय भीम.
सत्याला मित्रांनो कधी सोडू नका
आपल्या वचनांना तोडू नका
जे विसरले भीमाच्या उपकारांना
अशा लोकांशी नातं जोडू नका

भीमाने आपल्याला शक्तीवान बनवलं
जी हटवता येणार नाही अशी शक्ती बनवलं
नव्या युगातील ओळख आम्हाला बनवलं
आणि एका हवेच्या झुळुकेला वादळ बनवलं
ना सुरी ठेवतो ना
ना पिस्तुल ठेवतो
जय भीम चा मुलगा आहे
मनात जिगर ठेवतो आम्ही
जय भीम
देशासाठी ज्यांनी विलासाला नकार दिला
वंचितांना ज्यांनी स्वाभिमान दिला
ज्यांनी आम्हाला कोणत्याही वादळाशी टक्कर द्यायला शिकवलं
तो देशातला अनमोल हिरा बाबासाहेब म्हणून ओळखला जातो
आज त्यांची शिकवण आम्ही अंगा बाणली
जय भीम...
ओम म्हटल्याने मनाला शांती मिळते
साई म्हटल्याने मनाला शांती मिळते
पण जय भीम म्हटल्याने माणसाला माणूस म्हणून ओळख मिळते
अशी माझ्या बाबांची वाणी आहे
नमो बुद्धाया जय भीम...!
बाबासाहेबांवरील गाणे...!
भिमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले..!
त्रिसरण पंचशीलाचे सुर जुळाले भिमराया मुळे आम्हा बुद्ध मिळाले !
दिव्य ज्ञानाचा दाऊनी प्रकाश दीनदुबळ्यांचा केला
विकास अज्ञानाचे असुर ते दूर पळाले
भिमराया मुळे आम्हा बुद्ध मिळाले ।। १ ।।
जीर्ण रुढीच्या जीर्ण चालीरीती
नष्ट केल्या देऊन मुठ माती
अंधश्रद्धेचे सारे रान जळाले
भिमराया मुळे आम्हा बुद्ध मिळाले ।। २ ।।
साऱ्या ग्रंथांचा करुनी व्यासंग
बुद्ध धम्मात होताची दंग
मानवाला जीवनाचे महत्व कळाले
भिमराया मुळे आम्हा बुद्ध मिळाले II ३ II
कुंकू लावील रमानं, कुंकू लावीलं रमान!
माझ्या भीमाच्या नावाच
कुंकू लावील रमान कुंकू लावील रमान, कुंकू लावील रमान...!
अशी मधुर मंजुळ वाणी
माझ्या रमाई ची कहाणी
वागे घरात नेमान,
कुंकू लावील रमान..!
नाही गेली आज्ञा बाहेर
कधी आठवल ना माहेर
केला संसार दमान
कुंकू लावील रमान...
रमा उपवासी राहिली,
दीनदलितांची माउली
नाव कमविले श्रमान,
कुंकू लावील रमान..!
उघडलाच नाही काळारामाचा दरवाजा..!
उघडलाच नाही काळारामाचा दरवाजा..
गोदा तीरी पडला तरी लढला सैनिक माझा..
उघडलाच नाही काळारामाचा दरवाजा..
जाण्याची कवाडे इथली उघडलीच नाही..
आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही..
आघाडीत होता जरी नऊ कोटीचा राजा..
उघडलाच नाही काळारामाचा दरवाजा..
माणसास पाणी पाजा माणसास पाणी..
निनादत होती सारी भीमाचीच वाणी..
इतिहास होता चवदार तळ्याचा ताजा..
उघडलाच नाही काळारामाचा दरवाजा..
दारा उघड रामा आता दार उघड रामा..
पंढरीचा चोखामेळा आला तुझ्या धामा..
दर्शनाची संधी भीम मागत होता माझा..
उघडलाच नाही काळारामाचा दरवाजा..
राम दाखवा रे तुमचा राम दाखवा रे..
वामनास थोडी त्याची चवी चाखवा रे..
बोलले पुजारी जा थेडग्यांनो जा जा..
उघडलाच नाही काळारामाचा दरवाजा..
गोदा तीरी पडला तरी लढला सैनिक माझा..
उघडलाच नाही काळारामाचा दरवाजा..
(गीत :- वामनदादा कर्डक)


Click it and Unblock the Notifications
