Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

BSP नेते हरबिलास सिंहंच्या हत्येतील आरोपीचा अंबाला पोलिस अन् STFकडून एनकाऊंटर! गोळीबारात 3 जवान जखमी

Ambala BSP Leader Harbilas Singh Rajjumajra murder: अंबाला येथील बहुजन समाज पक्षाचे नेते हरबिलास सिंह रज्जुमाजरा यांच्या खुनातील संशयित आरोपी सागर याला अंबाला पोलिसांनी चकमकीत ठार केले, या चकमकीत एसटीएफची पोलिसांना साथ मिळाली. या चकमकीत दोन ते तीन जवान जखमी झाले आहेत.

अंबाला पोलिसांनी बसपा नेते हरबिलास सिंह रज्जूमाजरा यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली. अंबाला पोलीस आणि एसटीएफने आरोपी सागरला चकमकीत ठार केले. या गोळीबारात दोन ते तीन पोलीस जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Ambala BSP Leader Harbilas Singh


कधी घडली होती खुनाची घटना

41 वर्षीय हरबिलास रज्जुमाजरा, बसपचे राज्य सचिव आणि नारायणगड, अंबाला येथे विधानसभा निवडणूक लढवले होते, यांची 24 जानेवारी रोजी पाच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. शहराच्या मध्यभागी असलेल्या अहलुवालिया पार्कजवळ ही घटना घडली. या घटनेने अंबाला शहर आणि राज्यात एकच खळबळ उडाली होती.

कशी झाली होती हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी हरबिलास हे पार्कजवळ मित्रांसोबत इनोव्हा कारमध्ये बसले होते. त्यावेळी दुसऱ्या गाडीतून आलेल्या तीन ते चार हल्लेखोरांनी संधी मिळताच हरबिलास यांच्या गाडीवर दोन्ही बाजूंनी हल्ला केला. गोळीबार होताच हरबिलास व त्याचे साथीदार सैरावैरा धावले, मात्र हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करून गोळीबार केला. या हल्ल्यात हरबिलास यांच्या छातीत पाच गोळ्या लागल्या, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

सहकारी जखमी

हल्लेखोरांनी जेव्हा गोळीबार केला होता, त्याचवेळी त्यांचा एक सहकारी चुन्नू डांग याला गोळी लागली होती. त्यांना चंदीगड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा तिसरा साथीदार गुगल पंडित हा हल्लेखोरांशी झालेल्या झटापटीत जखमी झाला होता. घटनेची माहिती मिळताच अंबाला एसपी सुरेंद्र सिंह यांनी भाऊरिया येथे पोहोचून परिस्थितीची पाहणी केली होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+