Delhi blast : 'रेड कार, रोकड अन् कट्टरतावाद': अल फलाह विद्यापीठातील दहशतवादी कनेक्शन उघड!
Al Falah University Case New Update : फरिदाबाद येथील अल फलाह विद्यापीठाशी (Al Falah University) संबंधित व्हाईट कॉलर दहशतवाद प्रकरणाच्या तपासातून धक्कादायक आणि गंभीर रहस्ये उघड झाली आहेत.
हा तपास केवळ एका गुन्ह्याच्या घटनेवर प्रकाश टाकत नाही, तर एका शैक्षणिक संस्थेच्या आत कार्यरत असलेल्या एका जटिल, गुप्त आणि कट्टरतावादी नेटवर्कची माहिती उघडकीस आलेला प्रकार आहे.

काश्मिरी प्राध्यापकांचे वर्चस्व
तपासातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या दहशतवादी नेटवर्कचे केंद्र हे विद्यापीठाचे आवार होते आणि या गटावर काश्मिरी प्राध्यापकांचे वर्चस्व होते. आरोपी डॉ. शाहीनच्या कथनानुसार, विद्यापीठातील एका विशेष गटाने कट्टरपंथी कल्पना राबवून छुप्या ऑपरेशन्सची योजना आखली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नेटवर्कमध्ये प्रामुख्याने काश्मिरी कर्मचाऱ्यांचा समावेश होता, जे एकूण कर्मचाऱ्यांच्या सुमारे ७० टक्के होते. गैर-काश्मिरी कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक या नेटवर्कपासून दूर ठेवण्यात आले होते, जेणेकरून गटावर त्यांचे पूर्ण नियंत्रण राहील. डॉ. शाहीन यांच्या मते, यामुळे कॅम्पसमध्ये एक वेगळे सांस्कृतिक आणि भाषिक वातावरण निर्माण झाले होते.
मुझमिल आणि उमरची भूमिका
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुजम्मिलने लॉजिस्टिक्स हाताळले. वाहनांची जबाबदारी, स्थान बदलणे आणि गोपनीय स्टोरेज. त्याच वेळी उमरने कट्टरपंथी कल्पना पसरवण्याचे आणि कट रचण्याचे काम केले. लवकरच मोठा हल्ला होणार असल्याचे उमरने स्वतः सांगितले असल्याचे डॉ शाहीनने सांगितले.
जकात, धर्मादाय आणि दहशतवादी निधीची समस्या
या प्रकरणाने धार्मिक दानाच्या नावाखाली चालणाऱ्या निधीच्या गैरवापरावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. मुजम्मीलने जकात (Zakat) आणि चॅरिटीच्या (Charity) नावाखाली एक फंडिंग नेटवर्क चालवले होते.
डॉ. शाहीन यांना मिळालेले पैसे आणि सुमारे २०-२२ लाख रुपयांचा निधी दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. अटकेपूर्वी मुजम्मीलने एक लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मागितल्याचेही उघड झाले आहे.
शस्त्रे, सीसीटीव्ही आणि 'सुरक्षित क्षेत्र' म्हणून कॅम्पस
या नेटवर्कच्या गंभीरतेची कल्पना येण्यासाठी जप्त करण्यात आलेली सामग्री आणि संशयास्पद कृती निर्णायक ठरल्या आहेत.
गुप्त उपकरणे
तपासादरम्यान डॉ. शाहीन आणि मुजम्मील यांच्या बॅगमध्ये एक मोठे आणि एक छोटे शस्त्र तसेच सीसीटीव्ही उपकरणे आढळून आली.
सेफ झोनची शंका
शस्त्रे आणि सीसीटीव्ही आढळल्याने विद्यापीठाच्या परिसराचा वापर गुप्त आणि दहशतवादी कारवायांसाठी 'सेफ झोन' म्हणून होत असल्याची शंका बळावली आहे.
बॅरल आणि गुप्त ऑपरेशन्स
'स्वच्छतेच्या कामाच्या' नावाखाली काही बॅरल कॅम्पसमध्ये नेले गेले होते, जे काही गुप्त ऑपरेशन्सशी संबंधित असू शकतात, असे डॉ. शाहीन यांचे म्हणणे आहे.
परदेशी संपर्क आणि पुढील तपास
हे प्रकरण केवळ देशांतर्गत नाही, तर या नेटवर्कचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावरही जोडलेले असल्याची शक्यता आहे. तुर्की आणि पाकिस्तानशी संशयास्पद संपर्क समोर आले आहेत, ज्यामुळे तपासाची व्याप्ती वाढली आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, तपास अजूनही सुरू आहे. डॉ. शाहीन आणि मुजम्मील यांच्यातील संबंध, फंडिंगचे चॅनल आणि हे परदेशी संपर्क यांचा सखोल आढावा घेतला जात आहे. विद्यापीठाचा परिसर खरोखरच दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात आहे का, यावर तपास यंत्रणा लक्ष केंद्रित करत आहेत.
-
Horoscope Today March 13 2026 : 'या' राशींच्या आयुष्यात आर्थिक लाभ अन् खास बदल, वाचा आजचे राशीभविष्य -
29 वर्षांपूर्वीची दुखापत अन् सक्तीची विश्रांती; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवर शस्त्रक्रिया! -
सोनं झालं स्वस्त! युद्ध असूनही भावात मोठी घसरण का?; वाचा मुंबई, पुणे अन् नागपूरचे आजचे ताजे दर -
PM Kisan 22nd Installment आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये; वेळ आणि स्टेटस तपासा -
पालकांकडून मिळालेल्या धड्यांनी माझ्या नेतृत्वाचा दृष्टिकोन घडवला: करण अदानी -
इराण-इस्त्रायल युद्धात उत्तर कोरियाची उडी: इराणवरील हल्ल्याचा निषेध,किम जोंग-उनांनी डागले मिसाईल! -
होर्मुझची कोंडी, युएईचा 'मास्टरस्ट्रोक'; इराण-इस्रायल युद्धाच्या सावटात भारतासाठी नवे ऊर्जा द्वार! -
महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय! अदानी फाऊंडेशन भारतातील 10 लाख महिलांना देणार उद्योजकतेचे बळ -
'धुरंधर-2' साठी प्रेक्षकांची तुफान गर्दी; रणवीर सिंहच्या स्पाय-ॲक्शन थ्रिलरचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू! -
Maharashtra weather update: एकीकडे महाराष्ट्र तापला! दुसरीकडे 'या' ठिकाणी पावसाचा इशारा -
शिवम दुबे-अंजुम खानची 'हटके' लव्हस्टोरी; धर्माची भिंत ओलांडली! शिवमपेक्षा पत्नी वयाने 'एवढी' मोठी -
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'ने मोडला पवन कल्याणचा रेकॉर्ड; पहिल्या दिवशी बाॅलीवूडला हादरवणारी 'एवढी' कमाई








Click it and Unblock the Notifications