Akshaya Tritiya Wishesh 2025: तुमच्या स्नेहीजण-मित्रपरिवाराला द्या अक्षय्य तृतीयेच्या खास शुभेच्छा!
Akshaya Tritiya 2025 wishes shubhechha in Marathi : हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेच्या तिथीला तथा सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा हा सण 'अखाती तीज' म्हणून देखील ओळखला जातो. या दिवशी सूर्य आणि चंद्र हे दोन्ही ग्रह उच्च राशीत स्थित असून याचे शुभ परिणाम पाहायला मिळतात.
अक्षय्य तृतीया: तारीख आणि शुभ मुहूर्त (Happy Akshaya Tritiya 2025 in Marathi)
यंदा अक्षय्य तृतीया 30 एप्रिल 2025, बुधवार रोजी साजरी होईल. वैशाख शुक्ल तृतीया तिथी 29 एप्रिल रोजी संध्याकाळी 5:32 वाजता सुरू होईल आणि 30 एप्रिल रोजी दुपारी 2:13 वाजता संपेल. तिथीनुसार अक्षय्य तृतीया 30 एप्रिल रोजी साजरी होईल.
हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त असतो. या दिवशी सोनं खरेदीला विशेष महत्त्व असते.
स्नेहीजणांना द्या खास शुभेच्छा..! (Happy Akshaya Tritiya 2025 in Marathi)
या दिवशी सुरु केलेले कोणतेही शुभ कार्याचे फळास जाते. या शुभ प्रसंगी तुम्ही तुमच्या प्रियजनांना, मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना, मित्रपरिवाराला अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा द्या!, इमेज पाठवा किंवा व्हाट्सअप स्टेटस ठेऊन देखील शुभेच्छा संदेश देऊ शकतात.
चला तर अक्षय तृतीयाचे शुभेच्छा संदेश वाचा अन् मित्रपरिवाराला जरूर पाठवा..!

दिवसेंदिवस वाढत राहो तुमचा व्यवसाय
कुटुंबात सदैव राहो स्नेह आणि प्रेम
होत राहो तुमच्यावर सदा धनाचा वर्षाव
असा असो तुमचा अक्षय तृतीया सण..
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!
-----
तुमच्या घरावर होवो धनाची बरसात
लक्ष्मीचा असो वास
संकटाचा होवो नाश
शांतीचा असो वास..
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!
----
तुमच्या व्यवसायात वाढ होऊ देत,
तुमच्या कुटुंबात सदैव प्रेम आणि आपुलिक राहो,
संपत्तीचा वर्षाव होवो,
अक्षय्य तृतीयेचा शुभेच्छा !
----
घन न घन जसा बरसतो ढग
तशीच होवो धनाची वर्षा
मंगलमय होवो हा सण
भेटवस्तूंची लागो रांग..
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!
----
या अक्षय तृतीयेला
तुम्हाला मिळो प्रत्येक आनंद
जी इच्छा असेल ती होवो पूर्ण
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!
----

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुम्ही सोन्यासारखे चमका,
माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमची सर्वत्र समृद्धी होवो,
तुमच्यावर येणाऱ्या सर्व संकटांचा नाश होवो,
ऐश्वर्य आणि समृद्धीची देवी तुमच्या घरी येवो!
----
यश येवो तुमच्या दारात
आनंदाचा असो सगळीकडे वास
धनाचा होवो वर्षाव मिळो तुम्हाला सगळ्यांचं प्रेम
असा साजरा करा अक्षय तृतीयेचा सण..
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Happy Akshaya Tritiya 2025 in Marathi
----
मनाचा उघडा दरवाजा
जे आहे ते मनात व्यक्त करा
अक्षय तृतीयेच्या आनंदात
प्रेमाचा मधही विरघळू दे..
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!
---
प्रत्येक काम होवो पूर्ण
न काही राहो अपूर्ण
धन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन
घरात होवो लक्ष्मीचं आगमन..
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!
---
आशा आहे या मंगलदिनी
आपल्या जीवनात नवचैतन्य येवो
येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद
सुख, समाधान घेऊन येवो..
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!
----

आनंदाचे तोरण लागो दारी
सुंदर रांगोळी अवतरे अंगणी
सुखासमाधानाचा असो आजचा
दिवस हीच सदिच्छा..
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!
----
सोन्याच्या झळाळीप्रमाणे
उजळून जावो आयुष्य तुमचे
सुख,समृद्धी नांदो तुमच्या दारी
हेच मागणे ईश्वराकडे आमचे..
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!
---
अक्षय्य सुखाचा दिलासा
मनात कर्तृत्वाचा भरवसा
लक्ष्मीसवे मिळो सरस्वतीचा वारसा
शुभेच्छांना मुहूर्त हवाहवासा..
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!
----
प्रत्येक काम सोपे होवो,
कोणतीही गोष्ट अपूर्ण न राहो,
जीवन ऐश्वर्य आणि प्रेमाने भरले जावो,
देवी लक्ष्मी दररोज घरात वास करो...
अक्षय्य तृतीयेचा सण तुम्हाला खास जावो!
---
देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर असेल,
अक्षय्य तृतीयेला संपत्तीचे भांडार असेल.
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Akshaya Tritiya 2025 in Marathi
--
उमा, रमा, ब्राह्मणी, तुच माता
चंद्रावर सूर्य प्रकाश होतो,
नारद मुनी गातात
जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता
अक्षय्य तृतीयेच्या सर्वांना शुभेच्छा !
----

प्रत्येक काम पूर्ण होवो,
एकही स्वप्न अपूर्ण राहू नये,
जीवन संपत्ती आणि प्रेमाने भरले जावो,
लक्ष्मीचे तुमच्या घरी आगमन होवो,
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Akshaya Tritiya 2025 in Marathi
अक्षय्य तृतीया आणि सोने खरेदी
अक्षय्य तृतीया हा सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात समृद्धी आणि सौभाग्य येते, अशी मान्यता आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेकजण या दिवशी सोन्याचे दागिने, नाणी किंवा चांदीच्या वस्तू खरेदी करतात.
तसेच, या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करणे, गृहप्रवेश करणे, नवीन वाहन खरेदी करणे किंवा लग्नासारखे शुभ कार्य करणे अत्यंत शुभ मानले जाते. या सणाला अबूझ मुहूर्त मानले जाते, म्हणजेच कोणत्याही शुभ कार्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नसते. या दिवशी नवीन प्रकल्प किंवा व्यवसायाची सुरुवात केल्यास तो यशस्वी होतो आणि त्यात सतत वाढ होते, अशी श्रद्धा आहे.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!








Click it and Unblock the Notifications