Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अजित पवारांचा अजून एक प्लॅन..? राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यासाठी दिल्ली विधानसभेकडे वळविले लक्ष

विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळवल्यानंतर अजित पवारांनी आता दिल्ली विधानसभेवरही लक्ष केंद्रीत केले आहे. शनिवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाने त्यांचे पहिले ११ उमेदवार जाहीर केले. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या या निवडणुकांसाठी अजित पवारांनी मास्टर प्लॅन तयार केल्याचे सांगितले जात आहे.

Ajit Pawar

पहिली यादी जाहीर

अजित पवारांनी पहिल्या ११ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात बुराडी येथून रतन त्यागी, बादली मतदारसंघातून मुलायमसिंह, मंगोलपुरी येथून खेम चंद, चांदनी चौकातून खालिद उर रहमान, बल्लीमारन येथून महंमद हारून, छतरपूर येथून नरेंद्र तंवर, संगम विहार मतदारसंघातून कमर अहमद, ओखला येथून इमरान सैफी, लक्ष्मीनगर मतदारसंघातून श्री नमह, सीमा पुरी मतदारसंघातून राजेश लोहिया, गोकल पुरी येथून जगदीश भगत यांना मैदानात उतरवले आहे.

चार मुस्लिम उमेदवार

अजित पवारांच्या पहिल्या यादीत त्यांनी धार्मिक समि‍करणावर विशेष लक्ष दिल्याचे दिसले. दिल्लीतील धार्मिक समीकरण लक्षात घेत, पहिल्या यादीत चार मुस्लिम उमेदवार देण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी ही रणनीती आखल्याची चर्चा आहे. पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा हिरावल्या गेला होता. त्यामुळे आता तो दर्जा परत मिळविण्याासाठीचा मास्टर प्लॅन अजित पवार गटाने केल्याची माहिती मिळत आहे.

धडपड नेमकी कशासाठी?

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी राजकीय पक्षांना तीन राज्यांमध्ये लोकसभेच्या 2 टक्के जागा गरजेच्या आहेत. म्हणजे जवळपास 11 खासदार असणे आवश्यक आहे. तर चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता असेल, तरीही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवता येतो. त्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत किमान 6 टक्के मत अथवा दोन जागा निवडून आणणे आवश्यक आहे. किमान तीन सदस्यांचे तरी प्रतिनिधीत्व विधानसभेत असणे आवश्यक आहे. हेच गणित लक्षात घेऊन अजित पवारांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केल्याचे सांगितले जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+