Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

एअर इंडियाच्या विमान अपघाताचा कट होता का? एएआयबी तपास करणार- केंद्रीय मंत्री मोहोळ काय म्हणाले? वाचा

Air India plane crash Is the conspiracy AAIB will investigate : अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाच्या दुर्घटनेसंदर्भात कटाची शक्यता तपासली जात आहे. विमान दुर्घटनेत अडिचशेंवर प्रवाशांसह स्थानिक रहिवाशांचा बळी गेला होता. मागील महिन्यात ही घटना अहमदाबाद विमानतळावरुन लंडनसाठी विमानाने उड्डाण करण्याच्या सुमारे पाच मिनिटांत ही दुर्घटना घडली होती.

प्राप्त माहितीनुसार, केंद्र सरकारने विमान अपघातासंदर्भा तपासणीसाठी पथकं नेमले आहे. या पथकाकरवी विमान दुर्घटनेसंदर्भात तपास केला जात आहे.

Air India plane crash

कटाच्या शक्यतेचा ही होणार तपास

केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यानी विमान अपघातासंदर्भात सर्व बाजूने तपास केला जात आहे असे म्हटले आहे यासह त्यांनी विमानाची काही तोडफोड करण्यात आले होते का, याचाही तपास केला जाणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, विमान अपघाताचा तपास करणारी संस्था एएआयबी तोडफोड झाली होती काय या शक्यतेचाही तपास करत आहे.

काय म्हणाले केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ?

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एनडीटीव्हीशी बातचित केल्याचा हवाला देत लोकसत्ताने हे वृत्त दिले आहे. त्यानुसार मोहोळ यांनी विमान अपघातावर भाष्य केले आहे. यासह चालू असलेल्या तपासाविषयी ते व्यक्त झाले. मोहोळ म्हणाले, "या अपघाताचा सर्व दृष्टीने आणि सर्व अंगांनी तपास केला जात आहे. यासह घटनेच्या आधीची आणि नंतरची सीसीटीव्ही फुटेजचीही सखोल तपासणी केली जात आहे. विमानाचे दोन इंजिन असतात आणि बहुदा ते एकाचवेळी बंद पडणे हे दुर्मिळ असते या प्रकरणात विमानाचे दोन्ही इंजिन एकाचवेळी बंद पडले ही घटना सहसा घडत नाही."

..तर अपघाताचे नेमके कारण समजेल

मुरलीधर मोहोळ यांनी हेही म्हटले की, "अहमदाबाद विमान दुर्घटनेचे कारण काय, यावर लगेचच बोलणे उचित ठरणार नाही. या प्रकरणाचा तपास सुरु असून याचा अहवाल जारी होताच या अपघाताचे प्रमुख कारण स्पष्ट होईल. यामध्ये विमानात इंधनाची समस्या होती की, काही इतर गोष्टी याचा अंदाज लावणे तूर्त योग्य नाही, आगामी तीन महिन्यात अहवालातून अनेक गोष्टी स्पष्ट होतील."

दुर्घटना कशी झाली ? ब्लॅक बाॅक्स सांगणार!

मुरलीधर मोहोळ म्हणाले, विमानाचा ब्लॅक बाॅक्स सापडेलाल असून त्याचे विमान दुर्घटनेशी संबंधित तपास संस्था पडताळणी करत आहे. तो परदेशात पाठवण्याचा प्रश्नच येत नाही. काॅकपीट व्हाईस रेकाॅर्डर म्हणजेच सीव्हीआर आणि फ्लाईट डेटा रेकाॅर्डर म्हणजेच एफडीआर चा समावेश आहे. ब्लॅक बाॅक्समध्ये विमान उड्डाणाची सर्व रेकाॅर्ड्स असतात म्हणून त्यामुळे अपघाताची कारणे समोर येतील.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+