त्रिचीत एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, तांत्रिक बिघाडामुळे 3 तास आकाशात घालत होते घिरट्या
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने गेल्या तीन तासांपासून त्रिची विमानतळालगत विमान घिरट्या घालत आहे. शाहजाहला जाणाऱ्या विमानात बिघाड झालेला असून या विमानात सुमारे 141 प्रवासांचा समावेश आहे. दुसरीकडे विमानतळ प्राधिकरणाकडून इर्मजन्सी जाहीर केलेली आहे. या ठिकाणी शेकडो रुग्णवाहिका तैनात करण्यात आलेल्या आहेत. दुसरीकडे सुमारे तीन तासानंतर या विमानाचे इर्मजन्सी लॅंडिंग करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
लॅडिंग गिअरची हायड्रोलिक यंत्रणा निकामी
मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथून शारजाहला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात शुक्रवारी मोठा तांत्रिक बिघाड झाला. संध्याकाळी 5.40 वाजता विमानाने उड्डाण करताच लँडिंग गियरला जोडलेली हायड्रोलिक यंत्रणा निकामी झाली. तेव्हापासून प्लेन गेल्या दोन ते अडीच तास आकाशात प्रदक्षिणा घालत आहे.

विमानतळावर आणीबाणी जाहीर
एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट क्रमांक AXB 613 मध्ये 141 प्रवासी आणि चालक दलाचे सदस्य आहेत. बिघाड झाल्याचे लक्षात येताच विमानतळावर आणीबाणी जाहीर करण्यात आली. विमानातील इंधन कमी करण्यासाठी पायलट आकाशात चक्कर मारत आहे. यानंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग होण्याची शक्यता आहे.
विमान मंत्रालयाकडून सामान्य लँडिंगचा दावा
नागरी उड्डयन मंत्रालयाने यासंदर्भात सांगितले की, त्रिची ते शारजाहला जाणारे एअर इंडियाचे फ्लाइट IX 613 विमानतळावर सुरक्षितपणे उतरले आहे. डीजीसीए परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. लँडिंग गियर उघडत होता. फ्लाइट सामान्यपणे उतरले आहे, असा दावा त्यांनी केला. माध्यमांशी बोलताना विमान मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
#WATCH | Tamil Nadu: The Air India Express Flight IX 613 from Tiruchirapalli to Sharjah, which faced a technical problem (Hydraulic failure), has landed safely at Tiruchirapalli airport.
— ANI (@ANI) October 11, 2024
(Outside visuals from Tiruchirapalli airport) pic.twitter.com/ttcQCMW7HJ
विमानतळावर अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका
मिळालेल्या माहितीनुसार, वैमानिकाकडून आपत्कालीन संदेश मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका विमानतळावर तैनात करण्यात आल्या आहेत. आपत्कालीन बचाव पथकही सज्ज आहे. विमानतळावरील संपूर्ण कर्मचाऱ्यांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून लँडिंगची घोषणा होताच, विहित प्रक्रियेनुसार त्याचे इमर्जन्सी लँडिंग करता येते.
#WATCH | Tamil Nadu: The Air India Express Flight IX 613 from Tiruchirapalli to Sharjah, which faced a technical problem (Hydraulic failure), has landed safely at Tiruchirapalli airport.
— ANI (@ANI) October 11, 2024
(Outside visuals from Tiruchirapalli airport) pic.twitter.com/ttcQCMW7HJ
-
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
Kuldeep yadav wedding date : कुलदीप यादव बोहल्यावर चढणार! कोण आहे होणारी पत्नी वंशिका? जाणून घ्या -
पुरुषांनो, 'या' 5 सामान्य लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; असू शकतो वाढलेल्या प्रोस्टेटचा धोका! -
वयाच्या 30व्या वर्षीच विसरभोळेपणा वाढलाय? सावधान 'ब्रेन' हा आजार असू शकते, जाणून घ्या लक्षणे -
संभाजीनगरात पंचायत समिती निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा; अंबादास दानवेंचा भाजप उमेदवारावर हल्ला











Click it and Unblock the Notifications