एअर इंडियाच्या विमानाचा इमर्जन्सी अलर्ट, विमानाच्या हवेतच घिरट्या
मुंबईहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाची लँडिंग होत नसल्यामुळे या विमानाने इमर्जन्सी अलर्ट पाठविलेला आहे. हे विमान सध्या लंडनच्या बाहेरच आकाशात घिरट्या घालत आहे. एएल 129 7700 या विमानात लॅडींगपूर्वी नेमका काय प्राँब्लेम आलाय, हे अद्याप समजलेले नाही.
गेल्या अनेक दिवसांपासून मिळत होत्या धमक्या
भारतीय एअरलाईन्सच्या विमानांना यापूर्वी अनेकदा धमक्या देण्यात आल्या आहेत. जवळपास दोन डझन फ्लाईटला सोमवारी व मंगळवारी धमक्या देण्यात आल्या होत्या. आज गुरूवारीही मुंबईहून जाणाऱ्या दोन आंतरराष्ट्रीय विमानांना बाँम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली होती. त्यात आज या विमानाने इमर्जन्सी सिग्नल दिल्याने चर्चा वाढल्या आहेत.

आपत्कालिन संदेश देण्याचे कारण अस्पष्ट
या विमानाने आपत्कालीन सतर्कतेचा संदेश दिला आला आहे. मात्र, त्याची कारणे समजू शकली नाहीत. असे स्क्वॉक कोड (आणीबाणीच्या सूचना) अनेकदा आपत्कालीन परिस्थितीत दिले जातात. तशा सूचना या विमानाने दिल्या. सध्या ते हवेतच घिरट्या घालत आहे. हे squawk कोड सहसा 4 अंकी असतात. 0000 ते 7777 पर्यंत ते वेगवेगळ्या परिस्थितीत दिले जातात. यापैकी काही कोड निश्चित केले आहेत. ते विशिष्ट परिस्थितींत वापरले जातात. एटीसी जेव्हा विमान त्याच्या रेंजमध्ये प्रवेश करते तेव्हा पायलटला विमानाच्या ट्रान्सपॉन्डरमध्ये प्रवेश करण्यास अनुमती देण्यासाठी विमानासाठी स्क्वॉक कोड तयार करते.












Click it and Unblock the Notifications