इतकं सुरक्षित मानलं जाणारं ड्रीमलायनर कोसळलं तरी कसं? ध्रुव राठीने उपस्थित केला प्रश्न
अहमदाबाद शहरातून लंडनच्या दिशेने रवाना झालेलं एअर इंडियाचं बी787-8 ड्रीमलायनर विमान उड्डाणानंतर काहीच वेळात कोसळल्याने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या भयंकर अपघातात 242 प्रवासी आणि क्रू सदस्यांचा समावेश होता.

ही दुर्घटना विशेषतः धक्कादायक ठरते कारण ड्रीमलायनर हे विमान प्रकार अत्यंत सुरक्षित आणि आधुनिक मानला जातो. प्रसिद्ध यूट्यूबर आणि राजकीय विश्लेषक ध्रुव राठीने या दुर्घटनेबाबत सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना लिहिलं आहे, "इतिहासात प्रथमच बी787 ड्रीमलायनर कोसळल्याची घटना समोर आली आहे. हे विमान सर्वाधिक सुरक्षित मानलं जातं. ही घटना अत्यंत धक्कादायक आहे."
काय घडलं नेमकं?
AI-171 फ्लाइटने गुरुवारी दुपारी 1.31 वाजता अहमदाबाद विमानतळावरून लंडनच्या गॅटविकसाठी उड्डाण केलं. पण अवघ्या सात मिनिटांत, म्हणजे 1.38 वाजता, विमानाचा शेवटचा संपर्क कंट्रोल टॉवरशी झाला. यानंतर विमानाचा अचानक संपर्क तुटला आणि काही वेळातच मेघानीनगर परिसरात एक मोठा स्फोट झाला.
प्राथमिक माहितीमधून असं समजतंय की, या विमानानं शहरातील एका रुग्णालयाच्या इमारतीवर आदळलं. यामध्ये इमारतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, रुग्णालयातील किमान 15 डॉक्टर जखमी झाले आहेत. रुग्णांनाही दुखापती झाल्याची माहिती आहे.
विमानातील प्रवाशांची माहिती
या आंतरराष्ट्रीय फ्लाइटमध्ये 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिक होते. विमानात 2 पायलट आणि 10 केबिन क्रू सदस्यही होते. पायलट कॅप्टन सुमित सभरवाल यांना तब्बल 8200 तासांचे उड्डाण अनुभव असून, त्यांनी उड्डाणाच्या काही क्षणातच 'मे डे' कॉल दिला होता. मात्र, त्यानंतर कोणताही संपर्क होऊ शकला नाही.
अपघाताचं संभाव्य कारण आणि आग
प्राथमिक अंदाजानुसार, विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला असण्याची शक्यता आहे. लंडनसारख्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी विमानात मोठ्या प्रमाणावर इंधन भरलं गेलं होतं. त्यामुळे विमान कोसळल्यावर प्रचंड स्फोट झाला आणि विमानासह परिसरात भयंकर आग लागली. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य
अपघाताच्या क्षणी परिसरात काळ्या धुराचे मोठे लोळ उठताना दिसले. प्रशासन, अग्निशमन, एनडीआरएफ आणि बीएसएफचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचावकार्य सुरू असून, काही जखमींना उपचारासाठी जवळच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या सर्व रजा रद्द करण्यात आल्या आहेत.
सुरक्षित विमानप्रकार असूनही अपघात, गंभीर प्रश्न उपस्थित
ड्रीमलायनर ही विमानश्रेणी अनेक वर्षांपासून अत्याधुनिक टेक्नॉलॉजीसाठी ओळखली जाते. या घटनेमुळे या विमानाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून नागरिक, तज्ज्ञ आणि प्रवासी यांच्यात तीव्र चर्चा रंगली आहे.
सरकारी यंत्रणांचा तपास सुरू
एअर इंडिया आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) यांनी अपघाताच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्याचे काम सुरू आहे. संपूर्ण शहरात सुरक्षा वाढवण्यात आली असून नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
-
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
Kuldeep yadav wedding date : कुलदीप यादव बोहल्यावर चढणार! कोण आहे होणारी पत्नी वंशिका? जाणून घ्या -
पुरुषांनो, 'या' 5 सामान्य लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; असू शकतो वाढलेल्या प्रोस्टेटचा धोका!












Click it and Unblock the Notifications